Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूरात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी,आपण महापुरुषांची चरित्य वाचली तर तुमचे जीवन समृध्द होईल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी
शिरपूरात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी,आपण महापुरुषांची चरित्य वाचली तर तुमचे जीवन समृध्द होईल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी
शिरपूर प्रतिनिधी : साहित्य रत्न,संयुक्त महाराष्ट्र लढाईतील प्रबोधनकार अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती सोमवारी ( ता.०१ आॅगस्ट) रोजी शहरात उत्साही व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील अंबिका नगर भागात अर्धाकृती पुतळ्यास जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
पुतळ्यास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मान्यवरांचा हस्ते म. फुले,डाॅ.आंबेडकर,शाहु महाराज, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व कथेतील पात्र हे सामान्य लोकांचे आहेत.त्यांचे साहित्य वाचतांना ते कल्पीत कथा न वाटता आपल्या आजु-बाजुला घडलेल्या घटना व त्यांचे सुख:दुख वाटतात.महाराष्ट्रात संत, महापुरुष, समाज सुधारक यांचा वारसा लाभलेला आहे.
तरुण पिढीने या सर्वच महापुरुषांची चरित्र, साहित्य वाचले तर त्यांचे मार्ग कधीच भरकटणार नाहीत,असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले.शहरातील अंबिका नगर येथील चौकात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहराध्यक्ष हेमंत पाटील,बोराडी उपसरपंच राहुल रंधे,सामाजिक कार्यकर्ते सुरेश अहिरे,पत्रकार मनोज भावसार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, थोर समाज सुधारकांनी दिलेले विचार अंगीकारले तर प्रत्येकाच्या जीवनाचे कल्याण होईल व त्याचीच गरज आज आहे. चौका चौकात बसून आपला संबंध नसतानाही अनेक घडामोडींवर चर्चेत वेळ घालविण्यापेक्षा जर आपण महापुरुषांची चरित्य वाचली तर तुमचे जीवन समृध्द होईल.एवढी ताकद या साहित्यात असल्याचे चौधरी म्हणाले. सुञसंचालन दिलीप भाईदास पाटील यांनी केले.अंबिका नगर परिसरात उत्सव समितीचे अध्यक्ष विजय मारसाळे, सचिव नाना शिरसाठ आदिंनी परिश्रम घेतले.तर अंबिका नगर परिसरात लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी समाजबांधव यांची दिवसभर वर्दळ होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
धुळे प्रतिनिधी :- धुळे शहरातील देवपूर भागातील वाकसकर चेंबर, दत्त मंदिर चौक परिसरात असलेल्या 'श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड'च्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा