Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा - बबनराव चौधरी यांचं आवाहन
'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा - बबनराव चौधरी यांचं आवाहन
भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वतःसह नागरिकांना अभियानात सहभागी करून घ्यावं
शिरपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राबविण्यात येत असलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे.भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वतःसह नागरिकांनाही या अभियानात सहभागी करून घ्यावं असं आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केलं आहे.
भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी आपण साजरी करत आहोत.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा झेंडा डीपी म्हणून ठेवायचं आवाहन केलं आहे.हे आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे म्हणून आपण हातात तिरंगा घेतलेला डीपी लावावा असे आवाहान हि त्यांनी केले आहे.'हर घर तिरंगा' अभियान हा कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही तर आपल्या अस्मितेचा,राष्ट्रप्रेमाचा आणि देश भक्तीचा विषय आहे.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाले असून आज आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. येत्या १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकाने आपल्या घरावर आपल्या अस्मितेचं प्रतिक असलेला तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्राभिमान बाळगावा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरात राबविण्यात येणार अभियान आहे.
भाजपचे सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर तर तिरंगा फडकवावाच पण प्रभागातील, गावातील प्रत्येक नागरिकाला यात सहभाग घ्यायला सांगून अभियान यशस्वी करावं असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केलं आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा