Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा येथील लालचंद नगरात श्री महादेव श्री गणेश श्री साईनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन--भव्य दिव्य शोभायात्रेने सुरुवात.
शिंदखेडा येथील लालचंद नगरात श्री महादेव श्री गणेश श्री साईनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन--भव्य दिव्य शोभायात्रेने सुरुवात.
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी येथील लालचंद नगरात श्री महादेव,श्री गणेश,श्री साईनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . लालचंद नगर ट्रस्ट व नगरपंचायत नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे व गटनेते अनिल लालचंद वानखेडे यांच्या विशेष सहकार्यातून हया भव्य दिव्य तीन ही मुर्तीची प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमित्ताने आजपासून असून आज दुपारी तीन वाजता शोभा यात्रा काढण्यात आली.
सदर शोभा यात्रा शिवाजी चौक ते लालचंद नगर असा मार्गक्रमण होता.शोभायात्रेत लालचंद नगरातील रहिवासी महिला व तरुणी कलश घेऊन सहभागी झाल्या.माळी वाडा बालगोपाल भजनी मंडळ, परिसरातील भडणे,निरगुडी,दसवेल आदी गावांतील भजनी मंडळी चा विशेष सहभाग होता. ह्याचे नेतृत्व दिपक देशमुख,डॉ.विश्वास भामरे,पांडुरंग जिजाऊ माळी,
पिंपळीसकर यांनी केले होते.तसेच साईधुन डोलताशा पथकाने देखील उत्कृष्ट रितीने कामगिरी करित लक्ष वेधले ह्याचे नेतृत्व प्रमुख स्वप्निल मोरे यांनी केले.तसेच खुशी क्लासेस च्या मुला मुलींनी लेझीम पथकातुन नृत्य सादर केले. ह्यांना क्लासेस चे मयुरेश अग्रवाल व वर्षा अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले.न भूतो न भविष्यती अशी शोभायात्रा शहरातुन काढण्यात आली.
वाजतगाजत मुर्ती लालचंद नगर येथील मंदिराजवळ आणुन विधीवत पूजा करून नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे व गटनेते अनिल वानखेडे यांनी सपत्नीक आरती केली.त्यानंतर दिनांक 28/ 8 /22 रोजी रविवारी सकाळी श्री गणेश पूजन, मातृकापुजन ,नांदी श्राद्ध,अग्निस्थापन,जलाधिवास, ध्यायदिवास असे कार्यक्रम होणार आहे त्यानंतर सोमवार दिनांक 29/ 8 /2022 रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण,ध्वजारोहण, महा आरती त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
यासाठी आचार्य वेदशास्त्री ग्रामोपाध्याय श्री राहुल सुरेश जोशी रथगल्ली शिंदखेडा व श्री अमोल शुक्ल अमळनेर हे विधीवत पूजा करणार आहेत.तरी शहरातील मोठ्या प्रमाणावर भक्त भाविकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन लालचंद नगर रहिवाशांनी केली आहे.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदिप दिक्षित यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा