Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

थाळनेर पोलिस स्टेशन येथे गणेश उत्सवानिमित्त शांतता कमिटी बैठक संपन्न



शिरपूर प्रतिनिधी:थाळनेर दिनांक ३१/०८/२०२२ पासून आरंभ होणान्या गणेश उत्सवानिमित्ताने थाळनेर पोलीस स्टेशन येथे थाळनेर पोलीस स्टेशन येथील गणेश मंडळांची मा.प्रविण पाटील साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली.

सदर प्रसंगी थाळनेर पंचक्रोशीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

सदर बैठकीत गणेश मंडळांना उत्साहाने सण साजरा करावा म्हणून पोलीस अधीक्षकांनी शुभेच्छा देत कोणाला त्रास होणार नाही याबाबत विशेष काळजी घेणे या सूचना देण्यात आल्या.तसेच पर्यावरण पुरक गणेश मुर्तीचा वापर करणे या बाबत तसेच पर्यावरणपूरक सजावट समाज प्रबोधन विषयावर विचारांवर देखावे, स्वतंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावे,रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबीर, शालेय व महाविद्यालयीन विद्याथ्यांसाठी शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्य, पारंपारीक सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा,पारंपारीक देशी खेळांच्या स्पर्धा तसेच ध्वनी प्रदुषण होणार नाही याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर गणेश भक्तासाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे बाबत सुचित केले, त्यानंतर महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग मुंबई यांनी दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी पारित केलेल्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणान्या पुरस्काराचा शासन निर्णया संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले आहे.

त्याच प्रमाणे मूर्ती स्थापनेच्या वेळेस तसेच मुर्ती वित्सर्जनाच्या वेळेस पारंपारीक वाद्यांचा वापर करणे बाबत तसेच गुलानामुळे डोळयांना मोठया प्रमाणांत ईजा होते म्हणून गुलाल उडविण्यात येऊ नये संदर्भात गणेश मंडळांना मा.प्रविण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे यांनी आवाहन केलेले आहे.

शांतता कमिटीच्या तसेच गणेश मंडळाच्या बैठकीत मा.प्रविणकुमार पाटील सो-पोलीस अधीक्षक धुळे,मा.श्री.दिनेश आहेर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो शिरपूर विभाग शिरपूर तसेच थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उमेश बोरसेंसह पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी व अंमलदार असे हजर होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध