Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
इंजि मोहनजीं रावसाहेब सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी कडून दहीवेल येथे हर घर तिरंगा अभियान
इंजि मोहनजीं रावसाहेब सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी कडून दहीवेल येथे हर घर तिरंगा अभियान
भारतीय जनता पार्टी दहिवेल शहर कडून हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी "हर घर तिरंगा" अर्थात "घरोघरी तिरंगा " अभियान १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशभरात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, यासाठी इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याचे आव्हान इंजि मोहनजीं रावसाहेब यांनी केले.
यावेळी दहिवेल गावाचे उपसरपंच श्री रुपेश सतीश बच्छाव पिंपळनेर मंडळ उपाध्यक्ष श्री प्रवीण दादा देसले पिंपळनेर मंडळ युवा मोर्चा सरचिटणीस श्री दीपक पाटील दहिवेल शहराध्यक्ष श्री सुनील भाऊ माळी दहिवेल शहर् उपाध्यक्ष श्री अजय बच्छाव व रावसाहेब खैरनार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्री संजय बच्छाव आदी उपस्थित होते.
दहिवेल् गावातील जेष्ठ नागरिक श्री रावासाहेब आप्प्पा कोळी यांच्या हस्ते भारत मातेची प्रतिमा पूजन करण्यात आले आणि फटाक्यांची आतषबाजी करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. दहिवेलकर ग्रामस्थांनीही नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उस्फुर्त प्रतिसाद दिला
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा