Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा व राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकविण्यात आला



शिरपूर प्रतिनिधी:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा व राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकविण्यात आलाआर.सी.पटेल प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी शिरपूर येथे आज दि. 13/08/2022 वार शनिवार रोजी स्वातंत्र्याचा अम्रृत महोत्सव निमित्ताने राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्यात आला व प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली.
    
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गोपाल पाटील सर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सुरुवातीला सरस्वती मातेचं व भारत मातेच्या  प्रतिमेच पूजन करण्यात आले.
         
यावेळी सुरूवातीला राष्ट्रध्वज तिरंगा झेंडा चे ध्वजारोहण इयत्ता सातवी च्या विद्यार्थिनींनी केले.नंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.  स्पर्धेत इयत्ता 1पहिली ते सातवी पर्यंत चे विदयार्थी व विद्यार्थीनीनी सहभाग घेतला होता.स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातत्र्याचे अमृत महोत्सव या विषयावर व थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्यावर प्रश्न विचारण्यात आले. यावेळी व्ही जी सोनवणे आणि ऋतुजा पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले तर दिपक कोकणी,अनिल पावरा आणि मनीषा भदाणे यांनी परीक्षण केले.स्पर्धेत एकूण पाच ग्रुप होते. 

त्यात वि दा सावरकर,सरदार वल्लभ भाई पटेल,भगतसिंग,सुभाष चंद्र बोस, सुखदेव ,झाशी ची राणी लक्ष्मीबाई असे ग्रुप करण्यात आले. स्पर्धेत सुभाष चंद्र बोस यांनी प्रथम क्रमांक तर झाशी ची राणी या ग्रुप ने द्वितीय क्रमांक पटकाविला.  तसेच  यशस्वी  विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट रोजी गौरविण्यात येणार आहे.
  
सूत्रसंचालन श्रीम व्ही जी सोनवणे  यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम ऋतुजा पाटील यांनी केले. 
     
स्पर्धा यशस्वितेसाठी शाळेचे  मुख्याध्यापक गोपाल पाटील तसेच शाळेचे शिक्षक/शिक्षिका उज्वला दायमा, संजय करोडे ,दिपीका पाटील, स्नेहल शिंदे, व्ही.जी सोनवणे, ऋतुजा पाटील, संचिता पाटील ,अनिल पावरा, दिपक कोकणी, श्रद्धा सराग,मनीषा भदाणे दिपीका फुलपगारे युवराज धनगर ,अरविंद बोरसे यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध