Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२
बेटावद बेटावद येथे पांझरा नदीकाठी संरक्षण भिंतीसाठी महिलांची मागणी..!
बेटावद प्रतिनिधी:शिंदखेडा तालुक्यातील जळगाव व धुळे जिल्ह्याला जोडणारे गाव व तसेच तालुक्यातील मोठे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले पांझरा नदीच्या काठी वसलेले बेटावद येथे पांझरा नदीकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आता पुराच्या पाण्याचा धोका संभवतो आहे.यामुळे येथे संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी पाटील वाड्यातील महिला वर्गाने आपल्या लेखी निवेदन ग्रामपंचायत बेटावद येथे दि 27 /8/22 वार शनिवार रोजी सादर केले.
बेटावद गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूपासून ते थेट स्मशानभूमीपर्यंतच्या भागाला संरक्षण भिंतीची गरज असल्यामुळे तेथे संरक्षक भिंत बांधली जावी म्हणून मागणी होत आहे.कारण,पांझरा नदीला ज्याही वेळी पूर येतो त्या सर्व पाण्याचा प्रवाह हा बेटावद गावाकडे असल्यामुळे येथील नदीकाठी असलेली गाळाची माती ही दिवसेंदिवस खचत असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी काही मोठी अपरिहार्य घटना घडल्यास कोण जबाबदार असेल ? असाही सवाल नागरिक विचारत आहे.
प्रत्येक निवडणुकी वेळी लोकप्रतिनिधी या ठिकाणी येतात संरक्षक भिंती विषयी लोकांना आश्वासन देतात मात्र निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्षे या गोष्टीकडे बघत नाहीत.यामुळे येथील नागरिकांनी आता दाद कुणाकडे मागावी असा मोठा यक्ष प्रश्न येथील रहिवाशांसमोर उपस्थित होतो.
तरी या गोष्टीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपेचे सोंग करते आहे की काय असाही सवाल उपस्थित होत असतो.तरी स्थानिक प्रशासन व इतर कामात व्यस्त लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
निवेदन देते वेळी मीना शितोळे, मंगलाबाई पवार,संगीता पवार,रेणुका निकम,भारती निकम,सीमा निकम,
वैशाली पवार,मंगलाबाई पवार,माधुरी देशमुख,जिजाबाई कोळी,लक्ष्मीबाई कोळी,आरस्तोलबाई कोळी,सुनीता पवार आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा