Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

पाझरा कान साखर कारखाना भाडने साक्री येथे कारखाना साईटवर मिडिया लाईव्ह टेलिकास्ट सामूहिक चर्चासत्र चे आयोजन..!



साक्री प्रतिनिधी:पांझरा कांन सह.साखर कारखान्याचे सन.2023-24 ला 100% गाळप होणार असे आश्वासन स्पर्श शुगर मिल संचलित पांझरा कांन सा.का.चे डायरेक्ट मा.पवन मोरे साहेब यांचे अधिकृत प्रतिनिधी डेप्य.डायरेक्ट श्री धनंजय अहिरराव यांनी पत्रकारांशी 
काल दिनांक 28/8/2022.रविवार रोजी पाझरा कान साखर कारखाना (भाडने) साक्री येथे कारखाना साईटवर (मिडिया लाईव्ह टेलिकास्ट) सामूहिक चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते.व सोशल मीडियावर तसे आवाहन देखील साक्री तालुक्यातील सर्व शेतकरी कामगार,तरुण,या सर्वांसाठी खुली चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. 

या चर्चेसाठी तालुक्यातील मोठा जनसमुदाय येणार असल्याचेही वाटत होते परंतु ज्या लोकांना कारखान्याविषयी शंका,कुशंका अडी,अडचणी होत्या ती लोक मात्र तेथे चर्चेसाठी उपस्थित राहिले नाहीत म्हणून त्यांनी केलेले आरोप हे किती सत्य आहेत किंवा त्यामध्ये किती तथ्य आहे याबद्दल शंका निर्माण होते. जर तुम्ही सोशल मीडियावर कारखाना संदर्भात नेहमी वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोप करतात तर कालची खुली चर्चा करण्याची नामी संधी कारखान्याचे पदाधिकाऱ्यांकडून त्यांना देण्यात आली होती परंतु ते गैरहजर राहिल्याने असे निदर्शनास आले की त्यांना या प्रकल्पाविषयी जी काही कळकळ आहे ती फक्त सोशल मीडियावरच आहे लाईव्ह चर्चेसाठी मीडियासमोर यायला मात्र त्यांनी नकार का दिला हे मात्र अध्यापही कोडंच आहे यावेळी स्पर्श शुगर मिल संचलित पांझरा कांन साखर कारखान्याचे डेप्युटी डायरेक्टर श्री.धनंजय अहिरराव हे यावेळी उपस्थित होते. 

त्यांनी प्रसार माध्यमांची बोलताना सांगितले की पाझरा कान साखर कारखाना हा सन 2023-24 चा गाळ हंगाम 100% करणार असल्याचे सांगितले.यावेळी बोलताना श्री अहिरराव म्हणाले की कारखान्याचा करार झाल्यानंतर त्या दिवसापासून कारखान्यातून कुठलीही भंगार चोरीस गेलेले नाही किंवा विक्री केलेले नाही. असेही आम्ही पुराव्यानिशी सांगू शकतो.व राहिला विषय झाडांच्या बाबतीत जी झाडे कारखाना परिसरात गेल्या 25 वर्षापासून मोठ मोठी झाली आहेत तसेच कारखान्याचे काम करत असताना ट्रान्सपोर्टिंगसाठी अडथळा ठरत असणारी काही वेडी वाकडी झाडे आम्ही तोडली मात्र त्या बदल्यात आमचा कडून 25 ऑगस्ट ला 500 नवीन झाड लावण्याचा उपक्रम आमचा कडून करण्यात आला आहे त्यानंतरचा विषय हा कारखाना चालू होण्या संदर्भात आहे. 

तरी मी मा.स्पर्श शुगर मिल संचालित पांझरा कांन साखर कारखाना चे डायरेक्ट श्री पवनजी मोरे साहेब यांचा  लीगल प्रतिनिधी म्हणून या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की आम्ही कारखाना लवकरात लवकर कार्यान्वित करू असा आमचा मानस आहे असे आश्वासन यावेळी माध्यमांद्वारे जनतेला त्यांनी याप्रसंगी दिले पाझरा कान साखर कारखान्यावर काल तालुक्यातील काही शेतकरी, कामगार, तसेच तरुण मंडळी उपस्थित होते.परंतु त्या सर्वांचा एकच मतप्रवाह होता की फक्त कारखाना चालू झाला पाहिजे तो कोण करत आहे,कसा करत आहे,आणि कधी करणार आहे. 

या बद्दल आम्हाला काहीही देणे घेणे नाही केवळ सन 2023- 24 चा गाळप हंगाम आम्हाला सुरू करून द्यावा या व्यतिरिक्त आम्हाला कुठलीही शंका नाही तालुक्यातील वैभव असलेल्या पांझरा कान साखर कारखान्याच्या चिमणीतून एकदाचा धूर काढावा एवढीच आमची प्रामाणिक इच्छा साहेबांकडे आहे असे शेतकऱ्यांकडून याप्रसंगी बोलण्यात आले.तसेच साखर कारखाना या विषयावर कोणी राजकारण करू पाहत असेल तर त्याला लवकरच तालुक्यातील जनता धडा शिकवेल वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोपांचे पत्रके काढून एखादा युवा उद्योजकाला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

यापुढे असे बदनामकारक मेसेज जर सोशल मीडियावर कुणी व्यक्तिगत व्हायरल केले तरी तशा व्यक्तीस किंवा समूहास यापुढे कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल असेही यावेळी त्यांच्याकडून बोलण्यात आले तसेच काही लोकांच्या मनात काही प्रश्न किंवा संभ्रम असतील  त्यांनी थेट स्वतः संपर्क साधून भेट ग्यावी म्हणजे त्यांचे समाधान करता येईल परंतु सोशल मीडिया वरती यापुढे कोणीही व्यक्तिगत टिपणी केली तर तो कारवाईस पात्र राहील असे ही यावेळी माध्यमान समोर बोलण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध