Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम, लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा टॉपवर, जो बायडन पिछाडीवर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम, लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा टॉपवर, जो बायडन पिछाडीवर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. मॉर्निंग कन्सल्ट सर्वे या कंपनीनं केलेल्या सर्व्हेक्षणात नरेंद्र मोदींना ७५ टक्के रेटिंग मिळालं आहे. नरेंद्र मोदी यांनी अमेरिका, जर्मनी आणि जपानच्या नेत्यांना पिछाडीवर टाकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ टक्के रेटिंगसह पहिलं स्थान पटकावलं आहे. मोदी यांच्यानंतर मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्यूएल लोपेझ ओब्रॅडोर यांचा क्रमाक आहे. तर, तिसऱ्या स्थानावर इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांचा क्रमांक आहे. मेक्सिकोच्या अध्यक्षांना ६३ टक्के तर इटलीच्या पंतप्रधानांना ५४ टक्के रेटिंग मिळालं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. तर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे ४१ टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत. २२ देशांच्या यादीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी एकदा टॉपवर आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेऊ हे सहाव्या स्थानावर आहेत. तर, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा ३८ टक्के रेटिंगसह सातव्या स्थानावर आहेत. मॉर्निंग कन्सल्ट ही संस्था जगभरातील सरकारं आणि नेत्यांच्या कामगिरीचा आढावा आणि सर्व्हेक्षण करुन रेटिंग जाहीर करते. मॉर्निंग कन्सल्ट ही संस्था ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, ब्राझील, जर्मनी, भारत, मेक्सिको, नेदरलँडस्, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन आणि अमेरिका या देशांमध्ये कार्यरत आहे. मॉर्निंग कन्सल्ट ही संस्था जगभरात दररोज २० हजारहून अधिक मुलाखतीचं आयोजन करते. रेटिंग जाहीर करताना या संस्थेकडून सात दिवसांच्या सरासरी आकडेवारीचा आधार घेतला जातो. अमेरिकेत जवळपास ४५ हजार जणांची मतं जाणून घेतली जातात. तर, इतर देशांमध्ये ५०० ते ५ हजार जणांची मतं नोंदवून घेतली जातात. नोव्हेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं होतं. भारतामध्ये या संस्थेकडून ऑनलाईन मुलाखतींचं आयोजन करण्यात येतं. मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेकडून सदस्य देशातील स्थानिक भाषांमध्ये सर्वेक्षणकरण्यात येते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा