Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
दिनेशकुमार बागुल याच्याकडे आणखी करोडोंचे घबाड सापडण्याची शक्यता त्यामुळे न्यायालयाने बागुलला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
दिनेशकुमार बागुल याच्याकडे आणखी करोडोंचे घबाड सापडण्याची शक्यता त्यामुळे न्यायालयाने बागुलला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
नाशिक प्रतिनिधी:नाशिकमध्ये या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे काल गुरुवारी लाचलुचपत विभागाने कारवाई करत एक मोठा मासा गळाला लावला होता.कार्यकारी अभियंत्याला २८ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.त्या कार्यकारी अभियंत्याचे नाव दिनेशकुमार बागुल
नाशिक शहरात उंटवाडी येथील नयनतारा या निवासस्थानी लाचेची रक्कम स्विकारताना एसीबीने अभियंताला ताब्यात घेतले असुन त्याला २८ऑगस्ट पर्यंत
न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.दिनेशकुमार बागुल याच्याकडे आणखी करोडोंचे घबाड सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अधिक चौकशीसाठी बागुलचा रिमांड मागितला होता त्यामुळे न्यायालयाने बागुलला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाशिकच्या आदिवासी विकास विभागात कार्यकारी अभियंता म्हणून दिनेशकुमार बागुल कार्यरत आहेत . दिनेशकुमार बागुल यांनी एका ठेकेदाराकडे लाखोंची रक्कम लाच म्हणून मागितली होती.याबाबत ठेकेदाराने जेव्हा एसीबीकडे तक्रार केली,तेव्हा एसीबीने सापळा रचून या कार्यकारी अभियंत्याला रंथेहाथ पकडून काल अटक केली आहे.सेंट्रल किचन बिल मंजूर करण्यासाठी दिनेशकुमार यांनी ठेकेदाराकडे लाच मागितली होती.तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेतलाना त्यांना अटक करण्यात आली आहे.जवळपास १५ दिवस सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकमधील पथकाने ही कारवाई केली आहे.
बागुल यांच्या घरी काल एसीबीची टीम कसून तपास करत होती.त्यांच्या घरात आणखी घबाड आढळून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.त्या अनुशंगाने रात्री उशिरापर्यंत बागुल यांच्या निवासस्थानी एसीबीचे पथक कारवाई करत होते.एसीबीचे पथकांनी बागुल यांच्या इतर शहरांमधल्या मालमत्तावर देखील धाडी टाकल्या आहेत.यात कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आणि आता न्यायालयाने बागुलला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यामुळे बागुलकडे आणखी घबाड सापडण्याची शक्यता आहे सापडते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा