Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

टीईटी' घोटाळ्यातील दोषी शिक्षकांना बदतर्फ करावे..! एजंटाची नावे घोषित करून त्याच्यावर कारवाई आसी अपेक्षा



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी )घोटाळेबाजांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आता या यादीतील घोटाळेबाजांमध्ये विविध शाळांमधील कार्यरत असलेल्या शिक्षकांचा शोध घ्यावा लागणार असून त्यांना नोकरीतून काढण्याबाबतची कारवाई तात्काळ पूर्ण करावी लागणार आहे.

राज्यात जानेवारी 2020 मध्ये 'टीईटी ' परीक्षा घेण्यात आली होती.मोठया उलाढाली करत या परीक्षेतील निकालात भानगडी करण्यात आल्या. त्यातून अपात्र उमेदवारांना पात्र करण्याचा धडाका लावण्याची बाब पोलीस तपासात उघड झालेली आहे.

परीक्षा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी,एजंट,परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपनीचे संचालक,परीक्षा दिलेले उमेदवार या सर्वांनी संगनमताने या घोटाळा केला आहे.

यानंतर उशिरा का होईना पण परीक्षा परिषदेला शहाणपण सुचले अन त्यांनी घोटाळ्यातील ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी ३ऑगस्टला जाहीर केली.या उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून त्यांना भविष्यात 'टीईटी ' परीक्षाना बसण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.दरम्यान, परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त शैलजा दराडे यांनी प्राथमिक शिक्षण संचालक व माध्यमिक शिक्षण सचालकांना पत्र पाठवून शासन निर्णयानुसार पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.आता घोटाळ्याच्या यादीतील शिक्षकांची संख्या शोधावी लागणार आहे.

ते कोणत्या जिल्ह्यात,कोणत्या शाळेत काम करत आहेत याची माहिती राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांकडून जमा करावी लागणार आहे.त्यानंतर या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देवून खुलासा सादर करण्याची संधी मिळणार की त्यांना थेट नोकरीतून काढण्याची कारवाई होणार,याबाबत अद्यापही ठोस भूमिका घेण्यात आलेली दिसत नाही.

'टीईटी' घोटाळ्यातील दोषी शिक्षकांना बदतर्फ करावे.एजंटाची नावे घोषित करून त्याच्यावर कारवाई करावी.सन २०२१ च्या 'टीईटी' परीक्षेचा निकाल हा 'ओएमआर'शीटसह सार्वजनिक पद्धतीने तत्काळ लावण्यात यावा. दुसरी अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन करावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध