Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

बोरगांव ग्राम पंचायत तर्फे गावात 'हर घर तिरंगा' रॅली



शिरपूर प्रतिनिधी : आजादी का अमृत महोत्सव निमित्त तालुक्यातील बोरगांव ग्राम पंचायत तर्फे गावात 'हर घर तिरंगा' रॅली काढण्यात आली तसेच ज्यांनी देशासाठी दिवस रात्र सेवा दिली असे गावातील माजी सैनिक श्री दगेसिंग राजपूत यांचा सत्कार माजी सरपंच श्री नारायण लकडू राजपूत व गावाचे सरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष श्री योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

आपल्या भारत देशाला स्वतंत्र व्हायला या 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्त 'हर घर तिरंगा' ही संकल्पना केंद्र सरकार संपूर्ण भारतात राबवित आहे व 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान देशातील प्रत्येक नागरिकांने आपल्या घरावर तिरंगा फडकवायचा असे आव्हान देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे व तसा प्रचार व प्रसार संपूर्ण देशात होत आहे.

त्याच्याच एक भाग म्हणून शिरपूर तालुक्यातील बोरगांव ग्राम पंचायत तर्फे गावात 'हर घर तिरंगा' रॅली चे आयोजन केले गेले.विद्यार्थी तसेच गावातील नागरिक रॅलीत सहभागी झाले.हर घर तिरंगा,भारत माता की जय अशा घोषणा देत गावात रॅली काढण्यात आली.

प्रथमतः जि प मराठी शाळेत 'हर घर तिरंगा' संदर्भात ग्रामसेवक पी बी सोनवणे व शिक्षक गणेश पाटील यांनी ग्रामस्थांना माहिती दिली.तसेच सरपंच  सिसोदिया यांनी हर घर जल अभियान, संत गाडगे बाबा स्वछता व हगणदारी मुक्त अधिक गांव अभियान राबविण्या संदर्भात ग्रामस्थांशी हितगुज साधले व आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा व शौचालयचाच वापर करण्यासंदर्भात ग्रामस्थांना विनंती केली.

यावेळी सरपंच योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया,माजी सैनिक दगेसिंग मोहनसिंग राजपूत,माजी सरपंच नारायण लकडू राजपूत,रघुनाथ झुलाल कोळी,पोलीस पाटील मनोहर पाटील, विठ्ठल झुलाल कोळी, ग्रामसेवक पी बी सोनवणे, मराठी शाळा मुख्याध्यापिका अनिता जाधव, शिक्षक गणेश पाटील, अंगणवाडी सेविका सुरेखा सुधाकर जोशी, आशा सेविका निकिता जोशी,जगतसिंग नारायण राजपूत, संजीव सजन पाटील, दगा बुधा महाजन, खंडू झिंगा राजपूत, ग्रा पं सदस्य तानकु भिल, प्रकाश राजाराम न्हावी, झिंगा न्हावी, गुलाब फुला भिल, धना शाना भिल,राजू भिल, ग्रा पं शिपाई धुडकु भिल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध