Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान व स्वा. सै.शंकर पांडु माळी प्रतिष्ठान च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान व स्वा. सै.शंकर पांडु माळी प्रतिष्ठान च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
शिरपूर प्रतिनिधी:जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान व स्वा. सै.शंकर पांडु माळी प्रतिष्ठान च्या वतीने हिंदुस्तानातील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त व नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधुन शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शिरपुर शहरातील शकुंतला लॉन्स येथे जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन व उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांच्या वतीने करण्यात आले होते.सुरुवातीला संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिरपूर तालुक्याचे मा.तहसीलदार आबा महाजन यांनी भूषविले.तसेच कार्यक्रमासाठी मा.नगराध्यक्ष रावसाहेब प्रभाकर चव्हाण,मा.उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील,मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन,पीपल्स बैंकेचे संचालक संजय चौधरी,दिसान टेक्सटाइल पार्क चे ए.जी.एम शरद फूलपगारे,प्राचार्य आर.बी.पाटील सर,अहिल्या लॉन्स चे संचालक किशोर ठाकरे,भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज,महाराष्ट्र नाभिक महामंडळ च्या जिल्हा अध्यक्षा सौ.हेमलताताई येशी उपाध्यक्षा सौ.पल्लवी ताई शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.हेमलता संदीप वाडीले मॅडम यांनी केले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदाय समोर सहभागी असलेल्या स्पर्धकांनी दमदार हजेरी लावली.कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून एच.आर.पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य आर.बी.पाटील सर व आदर्श शिक्षक यशवंतजी निकवाड़े सर यांनी कार्य पाहिले.कार्यक्रमात सहभागी असलेल्या स्पर्धकांपैकी जिनल गुरव व त्यांच्या सहकारी यांनी सादर केलेल्या देशभक्ति पर पथनाट्य ला प्रथम पारितोषक २१०० रुपये सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी दिलीप येशी साहेबांच्या हस्ते तर मयूरी जयवंत पवार यांनी सादर केलेल्या देशभक्ति पर नृत्य ला द्वितीय बक्षीस १५०० रुपये स्टेट बैंकेचे सेवानिवृत्त कॅशियर रामचंद्र पवार साहेबांनी व माधवी मोरे यांनी सादर केलेल्या देशभक्ति पर गीताला तृतीय बक्षीस ११०० रुपये आदर्श शिक्षक यशवंत निकवाड़े सरांनी दिले तर ऋतुजा चौधरी व जगदीश माळी यांनी सादर केलेल्या देशभक्ति पर गिताला चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ५०० रुपये शिरपुर न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक सुधाकर वारुडे साहेबांनी देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
सदर कार्यक्रमात जिनल गुरव व त्यांच्या सहकारी विद्यार्थिनिन्नी सादर केलेल्या पथनाट्य व वेदांत पाटिल यांनी सादर केलेली क्रांतिकारांची यशोगाथा ला शिरपुर शहरातील श्रद्धा कन्स्ट्रक्शन व पल्लविताई शिरसाठ,
किशोर ठाकरे,आणि गणेश जैन यांच्या वतीने रोख स्वरुपाचे बक्षीस देखील देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एच.आर.पटेल महाविद्यालयातील प्राचार्य आर.बी.पाटिल सर,उप प्राचार्य जे.पी.पाटिल सर,व मनीषा पटेल मॅडम व इतर शिक्षक वृंद यांचे अप्रतिम सहकार्य लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा