Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईनंतर आता जीएसटी विभागातील अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात..!
नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईनंतर आता जीएसटी विभागातील अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात..!
नाशिक प्रतिनिधी:नाशिकमध्ये सीबीआय लाचलूपचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई सुरू आहे . आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईनंतर आता जीएसटी विभागातील अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.लाचलुचपत विभागाने जीएसटी अधिकाऱ्यावर केलेल्या या कारवाईचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.नाशिकच्या सिडको भागातील जीएसटी कार्यालयात सीबीआयने ही कारवाई केली आहे.दरम्यान जीएसटी विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये लाचलुचपत विभागाची धडक कारवाई सुरू आहे.अशात आदिवासी विभागातील अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईची घटना ताजी असतानाच आज पुन्हा लाचलुचपत विभागाची एक नवी कारवाई समोर येत आहे.कालच नाशिकच्या आदिवासी विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते.सेंट्रल किचन बिल मंजूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांना तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले होते.तर आज पुन्हा एक कारवाई समोर आली आहे .
गेल्या काही दिवसांत नाशिकच्या विविध विभागातील लाच प्रकारणे समोर येत असून यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याच निदर्शनास आले आहे.तर या प्रकरणांमुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे.दरम्यान,कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा