Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा शहरात वाजतगाजत मिरवणूकीने श्री गणरायाचे आगमन सार्वजनिक व घरगुती गणपती बाप्पा ची स्थापना..!
शिंदखेडा शहरात वाजतगाजत मिरवणूकीने श्री गणरायाचे आगमन सार्वजनिक व घरगुती गणपती बाप्पा ची स्थापना..!
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी शहरात व काॅलनी परिसरातील सार्वजनिक व घरगुती गणपती बाप्पा चे ढोल ताशा व डिजेच्या तालावर विविध मंडळांच्या पदाधिकारीनी वाजतगाजत मिरवणूकीने मोठ्या उत्साहात आगमन झाले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोणा महामारीच्या खंडानंतर ह्या वर्षी गणरायाचे जोरदार तयारी विविध मंडळांच्या पदाधिकारीनी सुरु केली.
शहरातील मुख्य चौकात आज सकाळपासून नंदुरबार,सुरत,
बामणे, धमाणे, शिंदखेडा, धुळे येथुन लहानांपासून मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पा ची मुर्तीचे आगमन करण्यात आले.सकाळपासुन गणपती व सजावट साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.बाजारपेठ फुलुन दिसत होते.
त्यानंतर दुपारपासून विधीवत पूजा करून सार्वजनिक व घरगुती गणपती बाप्पा ची स्थापना करण्यात आली. शहरातील लालचंद नगर,बी.के. देसलेनगर,वरुळ रोड शिवबा राजे, केदारेश्वर मंदिर,एकविरा काॅलनी,गणेश काॅलनी,गुरुक्रृपा काॅलनी, महावीर काॅलनी,सिंधी कॉलनी,जाधव नगर, गांधी चौक,साईलिला नगर,राजपूत गल्ली,देसाई गल्ली,साबरहट्टी,वीर एकलव्य नगर,धनश्री काॅलनी,जोगेश्वरी नगर,सिद्धार्थ नगर,मारोती मंदिर माळी वाडा यांसह विविध मंडळांच्या माध्यमातून गणरायाची स्थापना करण्यात आली.
शहरातील वरुळ रोड श्रीमंत शिवबा राजे गणेश मित्र मंडळातर्फे दरवर्षी शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध विषयांवर प्रदर्शन व कार्यक्रम होत असल्याचे मंडळ प्रमुख योगेश देसले यांनी सांगितले.ह्या वर्षी गणरायांची मोठ्या प्रमाणावर उत्साह संचारला आहे.शिंदखेडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा