Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

साक्री तालुक्याचे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री.सुरेश सोनवणे,मालपूर यांची राष्ट्रवादी कॉग्रेसच्या धुळे जिल्हा अध्यक्ष पदी निवड



साक्री तालुक्यातील मालपुर गावाचे रहिवासी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा संस्थापक सदस्य आण्णासाहेब सुरेश सखाराम सोनवणे यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धुळे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सुरेश आण्णा सोनवणे हे गेल्या सलग 40 वर्षांपासून शरद पवार साहेबांबरोबर एकनिष्ठपणे राहून काम करत आहेत. त्यांची यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिवपदी 6 वेळा निवड करण्यात आली आहे, तसेच धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, धुळे व नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्या अनेक संघटनात्मक पदांवर त्यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली आहे. साक्री तालुक्यातील पंचायत समितीवर गेल्या 23 वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अबाधित ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, निरीक्षक अर्जुन टिळे, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तथा धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेतील सर्व नेते व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध