Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अधिक चा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा आशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा वतीने साक्री तहसीलदार यांना देण्यात आले
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अधिक चा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा आशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा वतीने साक्री तहसीलदार यांना देण्यात आले
धुळे जिल्हा व साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करणे व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत साक्री तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव व धुळे जिल्हा किसान सभेचे जिल्हा पधादिकारी यांच्या वतीने मा.तहसीलदार सो.साक्री यांना निवेदन देण्यात आले अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने सर्व शेतकरी बांधवांना कागदी घोडे न नाचवता तसेच कुठलेही निकष व अटी शर्ती न लावता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त प्रमाणावर पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांचे कपाशी,तूर,भुईमूग,सोयाबीन,कांदा,बाजरी इतर सर्व पिके तसेच फळबागांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे,त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून फक्त 15 ते 20 टक्के पिके हातात येतील की नाही अशी शंका बळीराजाला येत आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असतांनाही आजपर्यंत राज्य शासनाने महसूल यंत्रणेला पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले नाहीत त्यामुळे बळीराजाच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.यामुळे बळीराजावर प्रचंड आर्थिक नुकसानाचा बोजा पडणार असून बळीराजाच्या सहाय्यासाठी कुठलेही निकष न लावता सरसकट नुकसान भरपाई मिळावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करून त्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जावी तसेच पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात अशी मागणी साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी,किसान सभा,कार्यकर्ते व तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांतर्फे व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे व्यक्त केली.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा