Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

दहिवद ग्रामपंचायत प्रांगणात लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ सुशमाताई वासुदेव पाटील,जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद जळगाव यांचे अध्यक्षतेखाली "हर घर झेंडा " या अभियान अंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन



अमळनेर प्रतिनिधी: दिनांक ८ ऑगस्ट रोजी दहिवद ग्रामपंचायत प्रांगणात लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ सुशमाताई वासुदेव पाटील,जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद जळगाव यांचे अध्यक्षतेखाली "हर घर झेंडा " या अभियान अंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

नमूद प्रसंगी लोकनियुक्त सरपंच सौ.पाटील यांनी व ग्राम विकास अधिकारी श्री सोनवणे यांनी राष्ट्रध्वज संहिता तसेच अभियान संदर्भात मार्गदर्शन केले व नागरिकांना ध्वज उभारणे व विकत घेणे संदर्भात माहिती दिली.यावेळी ज्येष्ठ ग्राम सदस्य बाळु आबा पाटील.सौ रेखाताई देसले.व इतर ग्रामपंचायत सदस्य ,हायस्कूल चे मुख्यध्यापक श्री विकास पाटील.जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक श्री रमेश पाटील तसेच दहिवद ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.श्री माणिक पाटील यांनीही आपले मत मांडले.व लोकनियुक्त सरपंच सौ पाटील यांचे सूचनेला सदस्यांनी अनुमोदन दिले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध