Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जनजागृती रॅली



शिरपूर प्रतिनिधी:आर.सी.पटेल प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी शिरपूर येथे आज दि. 08/08/2022सोमवार रोजी स्वातंत्र्याचा अम्रृत महोत्सव - स्वराज्य महोत्सव या अनुषंगाने जनजागृती रॅली काढण्यात आली. 
 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती शिरपूर बिट क्र १ व 2 चे शिक्षण विस्तार अधिकारी ए.बी. आव्हाड, शि.व.न.प.चे माजी नगरसेवक नरेंद्र पाटील डॉ.श्रध्दा भदाणे शाळेचे मुख्याध्यापक गोपाल पाटील सर उपस्थित होते. या प्रसंगी सुरुवातीला सरस्वती मातेचं व भारत मातेच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले.
   
यावेळीं ए.बी आव्हाड व मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विषयी मार्गदर्शन केले.नंतर रॅली काढण्यात आली.रॅलीत उत्साह पुर्ण वातावरण दिसून आले. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांबरोबर पालकही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

घोषवाक्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी भारत माता की जय,वंदे मातरम् ,मेरा भारत महान,जय जवान जय किसान,एक रुपया चांदी का भारत देश गांधी चा,हर घर झेंडा घर घर झेंडा,हर घर तिरंगा वाढविल भारताची शान,या जय घोषाने आसमंत दुमदुमून टाकला होता भारत माता, महात्मा गांधी ,लोकमान्य टिळक ,स्वातंत्र्य वीर सावरकर भगतसिंग,झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा विविध वेशभूषांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानींचा परिचय करून दिला.
  
सुत्रसंचालन श्रीम.दिपीका पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम.ऋतुजा पाटील यांनी केले.रॅली यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गोपाल पाटील तसेच शाळेचे शिक्षक/शिक्षिका कोरोडे सर,डी आर पाटील,स्नेहल शिंदे,व्ही.जी सोनवणे,ऋतुजा मॅडम, संचिता पाटील , अनिल पावरा,श्रद्धा सराग,मनीषा भदाणे यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध