Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२
दहिवद येथे गरिबांना मदत करत कानबाई उत्सव साजरा
अमळनेर प्रतिनिधी:कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात खान्देशात साजरा करण्यात येतो. दहिवद गावी मात्र यावेळेस देसले परिवाराने गावातील मजुरी काम करणाऱ्या गोरगरिबांना जेवणाचे चारताली डब्बे वाटप करत साजरा केला.या निमित्ताने उत्सवातून समाजसेवेचे दर्शन घडवले.
गावांतील देसले परिवारातील प्राध्यापक लेफ्टनंट जितेंद्र देसले यांनी कानबाई उत्सव व त्यांच्या आई स्वर्गीय लताबाई जिजाऊराव देसले यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने गावातील गरिबांना जेवणाचे चार ताली डबे वाटप केले.
या कार्यक्रमात मायबोली अहिराणीचा जागर करून तुफान विनोदी एकपात्री नाटक आयतपोयत सख्यानं प्रवीण माळी यांनी सादर केल.त्यांनी आहिराणीचा जागर करत समाज प्रबोधन करून संपूर्ण गावाला पोटधरून हसवले .यावेळी गावांतील असंख्य महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.त्याच बरोबर खानदेशातील लोकप्रिय गायक अशोक वनारसे यांचा कानबाई मातेच्या गीतांचा कार्यक्रम केला.गावाला यावेळेस यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते कानबाई मातेच्या गाण्यांनी संपूर्ण गाव भक्तिसागरात मंत्रमुग्ध होत रममान झाले.
गावात कानबाई मातेची मिरवणूक काढण्यात आली.यातच बऱ्याच दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने गावकऱ्यांचा आंनद द्विगणिक झाला .
उत्साहातुन समाजसेवेचे दर्शन घडवत दहिवद येथील देसले परिवाराने खान्देश मधील जनतेसाठी एक नवा आदर्श घडवून दिला. या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत सुरू असून अश्या कार्यक्रमांची गरज असल्याची चर्चा समाज माध्यमातून होत आहे.
यानिमित्ताने देसले परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा