Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

तापी नदीवरील सुलवाडे,सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजेसना मोठ्या प्रमाणावर गळती थांबवावी..! आमदार जयकुमार रावल यांनी विधानसभेत विचारले तारांकित प्रश्न..!



शिंदखेडा प्रतिनिधी:तापी नदीवरील सुलवाडे,सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजेसना मोठ्या प्रमाणावर गळती झाली असून त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून ही गळती अशीच सुरू राहिली तर तापी काठावरील गावाना धोका निर्माण होवू शकतो त्यामुळे ही गळती तात्काळ थांबवावी अशी मागणी माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे केली.

तापी नदीवरील सुलवाडे,सारंगखेडा आणि प्रकाशा ही बॅरेजेस झाली आहेत यामुळे यामध्ये अनेक करोडो लीटर पाणी साठलेले असते,हे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी,अनेक गावांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.या बॅरेजेसचे दरवाजे हे लोखंडी असल्याने कायमस्वरूपी पाण्यात राहील्याने हे दरवाजे गंजत असल्याचे दिसून आले होते त्यामुळे या बॅरेजेसना गळती लागली होती.

यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे ही जाणवले होते.एवढा प्रचंड खर्च करून बनवलेले हे बॅरेजेसचे पाणी वाया जात असल्याने ही गळती थांबविण्यासाठी काहीही प्रयत्न
होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी ही गळती तात्काळ थांबवावी असा प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले यात ते म्हणाले की,
सारंगखेडा बॅरेज प्रकल्पाच्या लोखंडी दरवाज्यांवर अधो बाजूस असणारा प्रकाशा बॅरेज पुर्ण क्षमतेने भरल्यावर उभ्या उचलद्वारांचा १.२५ मी.भाग अधोबाजुस पाण्याखाली राहतो यामुळे द्वारांचा खालील भाग पॅनेल १ गंजुन खराब झाला आहे मात्र यामुळे नदीकाठावरील गावांना कोणताही धोका नाहीये,सारंगखेडा बॅरेजवरील द्वार निरीक्षण अहवालाच्या अनुषंगाने वर्गवारी १ त्रूटीबाबत दुरुस्तीसाठी करावयाच्या उपाय योजना बाबत स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार सदर थोपद्वारे उच्चप्रतीचे गंजरोधक रंगकाम करण्याचे सुचविले आहे.

तसेच पॉलीन,होईस्ट ब्रिज,होईस्ट ॲरेजमेंट,स्टेअर केस आदी भागांची स्वच्छता करून गंजरोधक रंगकाम तातडीने करणेबाबत सुचविले आहे तसेच पावसाळ्यानंतर निरिक्षणाचा आढावा घेवून आवश्यकतेनुसार तिन्ही बॅरेजचे देखभाल दुरुस्तीचे काम घेणे नियोजित असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतलेले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध