Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा शहरातील उघड्यावरील मांस विक्री बंद करा भाजप उपशहर अध्यक्ष भुपेंद्रसिंह राजपूत यांची मागणी..!
शिंदखेडा शहरातील उघड्यावरील मांस विक्री बंद करा भाजप उपशहर अध्यक्ष भुपेंद्रसिंह राजपूत यांची मागणी..!
शिंदखेडा प्रतिनिधी:शिंदखेडा शहरात प्रत्येक रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून विना परवाना अनधिकृतरीत्या सर्रास उघड्यावर मांस विक्री होत असल्याने सर्वत्र ओंगळवाणे दर्शन होत आहे. याबाबत नगर पंचायत प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
येत्या आठ दिवसात अनधिकृतरीत्या उघड्यावरील मांसविक्रीची सर्व दुकाने त्वरित बंद करावीत,अन्यथा आम्ही ही सर्व दुकाने बंद करून दाखवु.होणाऱ्या सर्व परिणामांना नगर पंचायत प्रशासनच जबाबदार राहील, असा संतप्त इशारा शिंदखेडा भाजप शहर उपाध्यक्ष भुपेंद्रसिंह राजपूत यांनी आज शुक्रवार (ता.05) निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत पालिकेच्या मुख्याधिकारी यांना आज दिलेल्या निवेदनात, महादेव मंदीर,गांधीचौक,ग्रामिण रूग्नालय समोर, पारधी वाडा आदी ठिकाणी शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नगर पंचायत हद्दीत चोहोबाजूला अनधिकृतरीत्या उघड्यावर मांस विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत.सुरुवातीला अवघ्या छोट्या स्वरुपात असणाऱ्या या दुकानांचा विस्तार आता वाढला आहे. शहरात बाहेरगावाहून पाहुणा आल्यास प्रथम त्याला टांगलेल्या बोकडाचे दर्शन होते.हे शिंदखेडा शहराला साजेसे नाही.या दुकानांमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत.उघड्यावरील मांस विक्रीमुळे साथीच्या रोगांना एकप्रकारे निमंत्रणच दिले जात आहे.
ही अनधिकृत उघड्यावरील मांस विक्रीची सर्व दुकाने त्वरित बंद व्हावीत यासाठी वेळोवेळी अनेक पक्ष संघटनांनी नगर पंचायत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यावर तात्पुरती कार्यवाही करण्यापलीकडे प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई या दुकानदारांवर केलेली नाही.त्यामुळे संबंधित दुकानदार निर्ढावलेले आहेत. नगर पंचायत प्रशासनाने उघड्यावरील मांस विक्रीची सर्व दुकाने त्वरित बंद करावीत,अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता ही सर्व दुकाने बंद करू. त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांना नगर पंचायत प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा