Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
रुग्णवाहिकेतून जनावरांची तस्करी; एका गायीचा मृत्यू तर तिन गायीची अवस्था अत्यंत गंभीर
रुग्णवाहिकेतून जनावरांची तस्करी; एका गायीचा मृत्यू तर तिन गायीची अवस्था अत्यंत गंभीर
शिरपूर प्रतिनिधी : जनावरांची अवैध वाहतूक करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याची धक्कादायक बाब बुधवारी ता.३१ शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान उघडकीस आली.लहानशा जागेत दाटीवाटीने कोंबल्यामुळे एका गायीचा गुदमरून मृत्यू झाला,तर तीन गायीदेखील मृत्यूपंथाला लागल्या आहेत.या कारवाईत एकूण दोन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी एकाला अटक केली.
महामार्गावरून मध्य प्रदेशातून बोराडी मार्गे धुळे येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.त्यांनी बुधवारी पहाटे वाडी ता.शिरपूर गावाजवळ सापळा रचला. बोराडीकडून शिरपूरकडे येणाऱ्या रुग्णवाहिकेचा वेग पोलिसांना पाहून वाढल्याने त्यांना संशय आला.त्यांनी पाठलाग करून रुग्णवाहिका थांबविली.रुग्णवाहिकेची झडती घेतल्यानंतर सात गायी दाटीवाटीने कोंबल्याचे आढळले.त्यांची अवस्था पाहून पोलिसांनी धुळे येथील नवकार पांजरापोळ गोशाळेच्या वाडी येथील शाखेत वाहन नेले.
चालकास अटक
गो सेवकांनी तपासणी केल्यावर एक गाय मृतावस्थेत आढळली.तीन गायींची अवस्था अत्यंत गंभीर आहे.चालक विजय पौलाद चव्हाण वय २३,रा. महू,जि.इंदूर,मध्य प्रदेश याला अटक करण्यात आली.फोर्स कंपनीची रुग्णवाहिका एमपी०९,एफए ४५९३ व गायींसह एकूण दोन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ,हवालदार हेमंत पाटील,हेमराज पाटील,शिपाई भूषण कोळी,नाना अहिरे,भाऊसाहेब मालचे यांनी ही कारवाई केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा