Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १० सप्टेंबर, २०२२
शिरपूर येथील त्रिमूर्ती गणेश मंडळातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन..!
शिरपूर प्रतिनीधी : तालुक्यातील शिरपूर येथील भगवंत पार्क,राधेय नगर व सिसोदिया नगर यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती गणेश मंडळाकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तिघं कॉलनी मिळून २००७ साली म्हणजे १३ वर्षा पूर्वी त्रिमूर्ती गणेश मंडळाची स्थापना केली ज्यात मंडळाचे अध्यक्ष कुवरसिंग चव्हाण व उपाध्यक्ष राजू धनगर हे काम पाहतात.
दर वर्षी या मंडळातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी देखील रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची,गीत गायन स्पर्धा,अहिराणी नाटिका इ. कार्यक्रम राबविण्यात आले होते.
रांगोळी स्पर्धेदरम्यान घरोघरी अंगणात रांगोळी काढण्यात आली.रांगोळी स्पर्धेत रुचिता योगेंद्रसिंग सिसोदिया या 12वीच्या विद्यार्थीनीचा प्रथम क्रमांक आला.यावेळी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे निरीक्षण पी.डी.सोनार सरांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा