Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

राजकीय मतभेद बाजूला ठेवत आदित्य ठाकरे व चंद्रकात पाटील बनले बाप्पाच्या पालखीचे भोई..! सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोलाचा संदेश..! देव देवतांच्या पालखीला खांदा देऊन मोठेपण घेण्यापेक्षा भोई समाजांच्या समस्यांकडे देखील लक्ष द्या



राजकीय मतभेद बाजूला ठेवत आदित्य ठाकरे व चंद्रकात पाटील बनले बाप्पाच्या पालखीचे भोई..! 

सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोलाचा संदेश..! 

देव देवतांच्या पालखीला खांदा देऊन मोठेपण घेण्यापेक्षा भोई समाजांच्या समस्यांकडे देखील लक्ष द्या 

पुणे प्रतिनिधी : कोरोना प्रादुर्भाव असल्याने गेली दोन वर्ष गणेशोत्सव खुलेपणाने साजरा करता आला नव्हता मात्र यंदा कुठलेही निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात साजरा झाला.१० दिवस मनोभावे बाप्पाची सेवा करून आज (ता.९ ऑगस्ट) आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.मात्र,आगामी पालिका निवडणुका पाहता यंदाच्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीस राजकीय मंडळींनी हजेरी लावली आहे.

दरम्यान,राजकीय विरोधक असलेले नेतेही या निमित्ताने एकत्र बघायला मिळत आहे.आज पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेने नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे समोरासमोर आले. यावेळी त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत पालखी सोबत खांद्यावर घेतली. यावेळी गणेशभक्तांनी जोरात गणपती बाप्पा मोरया,अशा घोषणा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली असून यासाठी भाजपने शिंदेंना मदत केली हे उघड गुपित आहे.

यामुळे ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आहे. दरम्यान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ठाकरे एकत्र दिसणं दुर्मिळच. मात्र,असे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने आज घडले आहे.

मात्र दोघांनीही यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवत गणरायांच्या मिरवणुकीत हसतमुखाने सहभाग घेतलेला उपस्थितांनी अनुभवला.

केवळ विशिष्ट कार्यक्रमास देव देवतांच्या पालखीला खांदा लावून आम्ही पालखीचे भोई म्हणून घेण्यात व त्यातून फक्त आपल्या राजकीय हित साध्य करण्यासाठी व मते मिळवण्यापुरते भोई समाजाचा वापर आज पर्यंत राजकीय पक्षाने करून घेतलेला आहे.

यापुढे तरी या समाजाला न्याय देणार का असा प्रश्न बाप्पाच्या पालखी धरणाऱ्यांना भोई समाजाने विचारलेला आहे याचा विचार नक्कीच सर्व राजकीय पक्षांनी करावा जो भोई समाजाच्या हिताचे निर्णय घेईल व भोई समाजासाठी झगडेल त्या पक्षा पाठीमागे अखंड महाराष्ट्रातील भोई समाज नक्कीच खंबीरपणे उभा राहील असे या समाजातील ज्येष्ठ व श्रेष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध