Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट ! जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित
धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट ! जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित
धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले आहे.जिल्हाभरात तब्बल 290 बोगस डॉक्टरांची यादी प्रशासनाकडे असून देखील गेल्या आठ महिन्यात फक्त पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे
बोगस डॉक्टर अनेकांच्या जीवाशी खेळताहेत सर्वसामान्य आणि अत्यंत गरीब कुटुंबातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याने हे रुग्ण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. मात्र जिल्ह्यात अनेक जण वैद्यकीय शिक्षण न घेता प्रमाणपत्र नसताना देखील वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे.
यामुळे अनेकांच्या जीवाशी हे बोगस डॉक्टर खेळत असल्याचे समोर आले आहे.हे बोगस डॉक्टर अपूर्ण माहितीच्या आधारावर रुग्णांना औषधे देत असल्याने यामुळे अनेकांना गंभीर आजारांचा देखील सामना करावा लागला आहे.बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आले आहे.या समितीकडे जिल्ह्यातील 290 बोगस डॉक्टरांची यादी असून आत्तापर्यंत फक्त पाच जणांवर कारवाई झाली आहे विशेष म्हणजे या समितीच्या कुठल्याही बैठका वेळेवर होत नाहीत.
जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची संख्या पुढीलप्रमाणे
धुळे जिल्ह्यात नऊ तालुक्यात 290 बोगस डॉक्टरांची संख्या असून यातील सर्वाधिक संख्या ही धुळे तालुक्यात आहे.धुळे तालुक्यात 93 तर साक्री तालुक्यात 86 शिरपूर तालुक्यात 70 आणि शिंदखेडा तालुक्यात 41 असे बोगस डॉक्टर असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षकांकडे पाठवली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी त्यांची यादी जाहीर करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.मात्र अद्यापही ही यादी प्रसिद्ध झाली नसून बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा