Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्यातील तब्बल १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; शिंदे आणि ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील तब्बल १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; शिंदे आणि ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजले असून निवडणूक आयोगाकडून १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. १८ जिल्ह्यातील या ग्रामपंचातींसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. मदान यांनी सांगितलं की, संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे २४ व २५ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २८ सप्टेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.
नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबर रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.
खरंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. मात्र विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह स्थानिक नेते या निवडणुकीसाठी आपले राजकीय कसब पणाला लावतात. कारण या निवडणुकांमध्ये मिळालेली ताकद पुढे तालुका पातळीवरील निवडणुकीसाठी उपयुक्त ठरते. त्यातच राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या उलथापालथीमुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकींना आक्रमकपणे सामोरे जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकांमध्ये कोणाचं पारडं जड ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा