Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ४ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री शहराचा विकासासाठी धुळे जिल्हा भाजप चे सरचिटणीस श्री.शैलेद्र आजगे यांनी आपल्या पदाधिकारी सोबत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन
साक्री शहराचा विकासासाठी धुळे जिल्हा भाजप चे सरचिटणीस श्री.शैलेद्र आजगे यांनी आपल्या पदाधिकारी सोबत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन
साक्री नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मतदारांना दिलेले आश्वासन पाळण्यासाठी शहरात विविध विकास कामे करणे आवश्यक आहे. मतदारांनी सत्ता भाजपाच्या हातात दिल्यानंतर आता विकास कामे करणे गरजेचे आहे. यासाठी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांसंदर्भात निवेदन देण्यात आले. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन मंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे विभागीय संयोजक योगेश भामरे, अध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हा सरचिटणीस राकेश अहिरराव, भाजपा साक्री शहर सरचिटणीस पंकज हिरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना साक्री शहरातील अतिक्रमण रेग्युलाईझ करणे, घरकुल योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देणे, साक्री शहरात रोजगार निर्मिती करणे, भूमिगत गटारी करणे, रस्ते व शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध विकास कामे करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील प्रभाग क्रमांक ७, ९, ११, १२, १३ या प्रभागांसाठी पहिल्या टप्प्यातील सात कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती भाजपाचे शैलेंद्र आजगे यांनी दिली. विकास कामांसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच 'शैलेंद्र तू भाजपचा जुना कार्यकर्ता आहेस'. त्यामुळे तुला न्याय दिला जाईल असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैलेंद्र आजगे यांना दिला.
साक्री शहरात जुने गाव परिसरात गोरगरीब नागरिकांची वस्ती आहे. या ठिकाणी वर्षानु वर्ष ते राहतात. हा भाग अतिक्रमण असल्याने त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारचा जागेचा उतारा होत नव्हता. त्यामुळे त्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे अतिक्रमण रेगुलाईज होणे महत्त्वाचे होते. तसे झाल्यास घरकुल योजनेचा लाभ या गोरगरीब नागरिकांना देता येईल अशी भूमिका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आली. त्यानुसार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. तसेच गावात भूमिगत गटारी रोजगार निर्मिती व शहराच्या सौंदर्य करण्यासाठी निधी मिळाल्यास निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होईल. त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली. मंत्री फडणवीस यांनी साक्री शहराचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असेही सांगितले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा