Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ४ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
मविप्र समाज संस्थेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार-शरद पवार,मविप्र समाज संस्थेला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे शरद पवार यांचे आवाहन
मविप्र समाज संस्थेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार-शरद पवार,मविप्र समाज संस्थेला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे शरद पवार यांचे आवाहन
नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ॲड. नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलने घवघवीत यश संपादन केले. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार,माजी खासदार देविदास पिंगळे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रा.बाळासाहेब पिंगळे हे मान्यवर उपस्थित होते.यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नूतन सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी.बी.मोगल, चिटणीस दिलीप दळवी,संचालकांचा शरद पवार व छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतांना संस्थेवर ६० कोटी कर्ज आणि इतर देणे ७० कोटी असे १३० कोटीचे दायित्व असल्याचे समजल्यानंतर याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त करून संस्थेला आधी कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या सूचना नूतन पदाधिकाऱ्यांना दिल्या.राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने संस्थेचे दायित्व कमी करण्यासाठी १ कोटीची देणगी त्यांनी जाहीर करून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वत:पासून सुरवात करून आपआपल्या रकमा संस्थेसाठी जमा करण्याचे त्यांनी आवाहन केले.यावेळी छगन भुजबळ,*माणिकराव कोकाटे*, दिलीप बनकर यांनी प्रत्येकी ५-५ लाखाची तर देविदास पिंगळे आणि विश्वस्तांनी प्रत्येकी लाख-लाख रुपयाची देणगी जाहीर केली. याप्रमाणे दीड कोटी रुपये जमा झाले...
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा