Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

हाडाखेड चेकपोस्ट वर आर.टी.ओ.अधिकाऱ्यांची व त्यांनी पाळलेल्या गावगुंडांची सर्रास दादागिरी मध्यप्रदेश मधील कंटेनर ड्रायव्हरला धक्काबुक्की करुन मारहाण ,सांगवी पोलीसांत तक्रार दाखल



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेकपोस्ट येथे प्रत्येक वाहन थांबवून त्याचे वजन माप केले जाते.जरी रिकामी गाडी असली तरी तीचे कागदपत्रे व फाईल आर.टी.ओ.ऑफिसमध्ये मागविले जाते.यांना गाडीजवळ जावून फाईल का चेक करता येत नाही गाडीचे ड्रायव्हर व क्लिनर यांना कोपन्यात आडोश्याला का बोलाविले जाते. नेमका कोपऱ्यात कोणता व्यवहार केला जातो ? तर प्रत्येक गाडीमागे ८०० ते १००० रुपये घेवूनच गाडी सोडली जाते न देणाऱ्यास तक्रारदाराप्रमाणेच इतरांना देखील मारहाण होते मात्र गरीब बिचारे ड्रायव्हर मार खावून देखील कोणाकडेही याची वाच्यता करत नाही म्हणून यांना अजून गोरखधंदा सुरु ठेवण्यास संधी मिळते.याच आर.टी.ओ.कार्यालयाच्या आजूबाजूला नेहमीच व २४ तास गर्दी का राहते ? नेमके हे गर्दी करणारे कोण ? याचे गुढ नेमके काय ? एका कंटेनरचा ड्रायव्हर ज्या वेळेस सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी आला तेव्हा ते रहस्य उलगडे.मध्यप्रदेशातील एका कंटेनरचा ( जी.जे.०६ ए.झेड.१७६२ ) ड्रायव्हर डालसिंग श्रीमानसिंग सोड वय ४५ हा प्लास्टीक पाईप ने भरलेली कंटेनर ग्वाल्हेर येथून जळगावकडे नेत असतांना तो हाडाखेड येथील चेकपोस्टवर येथे पोहचला.नेहमी प्रमाणे या ठिकाणी सदर गाडीचे वजन करण्यात आले.

वजन मर्यादित असल्याने कोणतीही कायदेशिर व बेकायदेशिर फि देण्याचा प्रश्नच नव्हता तरी देखील त्यास फाईल घेवून आर.टी.ओ.ऑफिसमध्ये बोलाविले.या ठिकाणी बेकायदेशिर फि ( लाच ) मागणी करण्यात आली.फि देण्यास ड्रायव्हरने नकार दिल्याने सदर ड्रायव्हरचा श्रीमुखात तेथे हजर असलेल्या आर.टी.ओ. कार्यालयाजवळ पाळलेल्या दोन चार गावगुंडांनी धक्काबुक्की करून मारहाण केली.यात मारहाण करणारे यांची नावे माहित नसल्याने असे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.यासर्व गोष्टीतून आर.टी.ओ. चेकपोस्ट वरील गोरखधंदा समोर येत आहे.याची खरीतर सांगवी पोलीसांनी कसून चौकशी करुन जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे यासाठी तात्काळ आर.टी.ओ. चेकपोस्ट वरील सर्वच सी.सी.टी.व्ही . फुटेज ताब्यात घेणे गरजेचे आहे.

व ऑफिसमध्ये बसणाऱ्या व फाईल चेक करणाऱ्या आर.टी.ओ.
अधिकाऱ्याच्या डोक्याच्या वरती ( छताला ) ऑनलाईन टाईम कॅमेरा बसविण्यात यावेत.म्हणजेच यांची रोजची खरी कमाई व कागदावरील कमाई याचे खरे पितळ उघडे पडेल.तसेच नेहमी नेहमी सी.सी.टि.व्ही फुटेज मध्ये दिसणारे गावगुंड कोण ? हे देखील समोर येईल.मात्र यावेळेस सांगवी पोलीसांनी खरोखर व कठोर कारवाई करणे जनतेस अपेक्षित आहे.

खरे पाहिले तर यापूर्वीच आमच्या वृत्तपत्रातून चेकपोस्ट बंद होण्याबाबतची बातमी प्रकाशित करण्यात आली होती.रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय,केंद्र शासन यांचे पत्र क्र..आर.टी.२३०१८ / ४७ / २०२१- दि ०६.० ९ .२०२१ संदर्भीय पत्रान्वये श्री. शशी भूषण,अवर सचिव भारत सरकार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी माहे जुलै २०१७ पासून सेवा व वस्तू कराची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यांच्या सीमांवर कोणतेही परिवहन तपासणी नाके असू नयेत असे कळविले आहे मात्र असे असतांना देखील महाराष्ट्र राज्यातील सीमा तपासणी नाके आजपावतो सुरु आहेत.

या मागचे नेमके कारण काय ? या प्रश्नाचे उत्तर वरील तक्रारीत दिसून येते की,या अधिकान्यांनी आपली खिसे भरण्यासाठी संबंधीत परिपत्रकाकडे कानाडोळा करून चेकपोस्ट सुरुच ठेवलेले आहे.याबाबत कुठेतरी आता परिवहन विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना यांची जाग आली . 

आणि अभय देशपांडे परिवहन आयुक्त ( अंमल २ ) यांनी याबाबत दि.३ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्रातील ठाणे कोल्हापूर,पुणे,नाशिक,धुळे, लातूर,नांदेड,अमरावती,नागपूर ( ग्रामीण ) पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,जळगांव , यवतमाळ चंद्रपूर,गोंदीया,नंदुरबार , उस्मानाबाद,सोलापूर,सिंधुदुर्ग यांना महाराष्ट्र राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करणेबाबत पत्र काढले असून याबाबत या सर्व सीमा तपासणी नाक्यांना सूचित करण्यात आले की आपल्या अधिनस्त सीमा तपासणी नाक्यांच्या शेजारील राज्यांतील सीमा तपासणी नाके बंद आहेत अगर कसे याबाबत आपल्या एका मोटार वाहन निरीक्षकास समक्ष भेट देवून वस्तुनिष्ठ अहवाल ( सीमा तपासणी नाक्यांच्या फोटोसहित ) सादर करण्यास आदेशित करावे . याबाबतचा आपला अहवाल तातडीने परिवहन आयुक्त कार्यालयास सादर करावा.सदर आधिकान्याच्या यापत्रातून अतिशय स्पष्ट होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध