Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान - नुकसानीची त्वरित पंचनामे करण्याची शिवसेनेची मागणी.
शिंदखेडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान - नुकसानीची त्वरित पंचनामे करण्याची शिवसेनेची मागणी.
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी- तालुक्यात आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे व विजेच्या गडगडाटासह जोरदार अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेवाडे, चिमठाणे,विरदेल, शिंदखेडा मंडळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिके कुजण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे म्हणून नुकसानीचे पंचनामे करण्याची तालुका शिवसेनेच्या वतीने मागणी केली आहे.
सुमारे पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील शेवाडे चिमठाणे विरदेल शिंदखेडा वर्षी आदि मंडळात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह जोरदार अतिवृष्टी झाली तर इतर मंडळात कमी अधिक मुसळधार पाऊसाचा फटका खरीप पिकांना बसला आहे.
त्यामुळे खरीप हंगामातील मुग, मका, उडीद,ह्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे तर कापूस, बाजरी आदी पिकांना देखील फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसापासून शेतांमध्ये साचलेले पाणी यामुळे पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे दरम्यान हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी मात्र हाधरला आहे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तातडीने मिळवून द्या अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे आधीच दोन वर्षांपासून दोन्ही हंगामातील पिकांचे कोरोणा महामारीच्या काळात प्रचंड नुकसान झाले होते त्यात शेतकरी कर्जबाजारी होऊन हवालदिल झाला आहे.
ह्या वर्षी देखील उशिरा पावसाने जेमतेम हजेरी लावली होती म्हणून शेतकऱ्यांनी इकडुन तिकडुन पैसे घेऊन बियाणे, खते,मजुरी पुर्ण केली होती आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना डोळ्यात अश्रू आणणारा मुसळधार पावसाने वक्रदृष्टी केली आहे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील शेवाडे, चिमठाणे, हातनुर मेथी,भडणे, विरदेल,चिलाणे,वरुळ घुसरे,अमळथे वरपाडे सोनेवाडी नेवाडे दत्ताणे,गव्हाणे,शिराळे,आदी गावांना परवा पहाटे विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील शेवाडे चिमठाणे विरदेल शिंदखेडा आदी मंडळाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांश शेती पाण्याखाली गेली असुन पिके कुजण्याची भिती निर्माण झाली आहे.ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान खरीप पिक विमा योजना काढला आहे त्यांना ही तातडीने मोबदला मिळावा तसेच तालुक्यातील मंडळनिहाय खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीचा महसूल कृषी व पिक विमा कंपनी, मंडळाधिकारी,तलाठी यांनी त्वरित पंचनामे करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा विधानसभा क्षेत्र संघटक गणेश परदेशी, जिल्हा संघटक मंगेश पवार,तालुका समन्वयक विनायक पवार, शहराध्यक्ष संतोष देसले, भाईदास पाटील, माजी सभापती रमेश बोरसे, राजेंद्र माळी, घनश्याम बोरसे, प्रदिप पाटील,रंगराव पाटील, नरेंद्र पाटील, सुकदेव यांसह पदाधिकारीनी मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून महसूल व तालुका कृषी विभाग मात्र अनभिज्ञ आहेत यांच्याकडे तक्रारी केल्यानंतरच हे विभाग जागृत होतील का अशी भावना आता शेतकरी व्यक्त करू लागले आहेत म्हणून तालुक्यातील शेतकरयांचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला जात आहे म्हणून कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने तात्काळ नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करावा. तसेच शासनाकडून नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी शिंदखेडा तालुका शिवसेना व शेतकऱ्यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा