Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिरपूर येथे विविध संघटना मार्फत भव्य बाईक रॅली संपन्न...!
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिरपूर येथे विविध संघटना मार्फत भव्य बाईक रॅली संपन्न...!
शिरपूर प्रतिनिधी:दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक 09.00 वाजता जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिरपूर शहरातून किसान विद्या प्रसारक संस्था मध्यवर्ती कार्यालयापासून ते शिरपूर तहसीलदार कार्यालयापर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली.या बाईक रॅली मध्ये शिरपूर तालुक्यातील विविध संघटनांचे राज्याचे व जिल्हा स्तराचे पदाधिकारी व शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.
बाईक रॅलीचे आयोजन शिक्षक नेते व राज्य सदस्य शिक्षक लोकशाही आघाडी(टिडीएफ)निशांतजी रंधे,जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हाध्यक्ष शशांक रंधे,धुळे शिक्षक लोकशाही आघाडी उपाध्यक्ष के.डी.बच्छाव, शिरपूर तालुका शारीरिक शिक्षक संघटना अध्यक्ष मनोज पाटील,शिरपूर तालुका लोकशाही आघाडी अध्यक्ष चेतन पाटील,शिरपूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष समीर जावरे, माध्यमिक शिक्षक संघाचे मा.कार्यवाह अमोल सोनवणे,धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष शरदराव सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षक संघाचे संदीप पाटील,भीमराव माळी, छोटू राजपूत, अनिल महिरराव,भोलेश्वर निकम, संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षकलोकशाहीआघाडी टिडीएफ
प्राथमिक शिक्षक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, क्रीडा संघटना शिरपूर तालुका, शिरपूर तालुका शिक्षकेतर संघटना, शिरपूर तालुका ग्रामसेवक संघटना, शिरपूर तालुका तलाठी संघटना, शिरपूर तालुका शिक्षक व शिक्षकेतर आश्रम शाळा संघटना, व इतर राज्य कर्मचारी संघटना या बाईक रॅलीत सहभागी होते. सदर निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यासाठी शासकीय प्रतिनिधी म्हणून शिरपूर तालुक्याचे तहसीलदार आबा महाजन यांना शिक्षक नेते निशांत रंधे जिल्हाध्यक्ष शशांक रंधे तसेच विविध संघटनाची एक समन्वय समिती नेमून त्या समितीमार्फत निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांना नविन अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली.
नंतरच्या काळात एन.पी.एस. योजनेत समाविष्ट करण्यात आले.सदरची NPS योजना रद्द करून "जुनी परीभाषीत योजना सर्वांना लागू करा" ही मागणी सातत्याने आम्ही सर्व कर्मचारी संघटना करीत आहोत.आज देखील संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीने भव्य मोटार सायकल (बाईक) रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.राजस्थान व छत्तीसगड राज्य शासनाने NPS योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना तेथील सर्व राज्य शासकीय कर्मचा-यांना लागू करून नवीन धोरण जाणीवपूर्वक स्विकारले आहे.
महाराष्ट्र राज्याने देखील समस्त कर्मचारी संघटनांच्या मागणीचा विचार करून राज्यात NPS योजना ऐवजी "जुनी पेन्शन योजना" लागू करावी असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. निवेदन देतांना शिरपूर तालुक्यातील शेकडो शासकीय निमशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर येथे एका तरुणाने 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये असलेल्या युवतीसोबतचे नाते तुटल्यामुळे संतापातून तिचे आक्षेपार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा