Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

अमळनेरात रात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनांत निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या तीन जणांना अमळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात..!



अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरात रात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनांत निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या तीन जणांना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडुन आठ गुरे व वाहन असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त निर्दयी वाहतूक करण्यात आला असून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हर्षल नरेंद्र ठाकूर व त्याचे मित्र पवन ज्ञानेश्वर बारी,योगेश कैलास लांडगे,अनिल दिलीप बडगुजर,मनोज शशिकांत मराठे यांनी गलवाडे रोडवर हा प्रकार उघड केला.

बेटावदकडून पिकअप गाडी ही अमळनेर शहरात भरधाव वेगात या दिशेने गेली सदर वाहनात गोवश असल्याचा संशय आल्याने हर्षल नरेंद्र ठाकूर व त्याचे मित्र पवन ज्ञानेश्वर बारी योगेश कैलास लांडगे,अनिल दिलीप बडगुजर ,मनोज शशिकांत मराठे यानी दुचाकीने पाठलाग सुरु केला आणि अमळनेर शहरातील पाचपावली चौकात लोकानी वाहन अडवले.वाहन अडवताच लोकांची गर्दी जमा झाली होती तेव्हा सदर गाडी क्रमांक पाहीली असता ती पिकअप गाडी क्रमांक एम एच ४६ ई ५२६२ असा होता व सदर वाहनात डोकावुन पाहीले असूता सदर वाहनात एकुण ८ गुरे निर्दयतेने कोबलेली होती त्यांना इजा पोहचेल अशी कुरतेने वागणूक देत कोबलेले होते.

वाहनात बसलेले संतोष प्रकाश चौधरी ( वय ३२ वर्षे रा शिरपुर जुने हुडको किस्मत नगर )सादीक उर्फ जाड्या इब्राहीम मिस्तरी ( वय ३५ वर्षे रा अंबीका नगर शिरपुर जि धुळे ) सरफराज बेग फरीद बेग ( वय १ ९ वर्षे रा के जी रोड शिरपुर अंबिका नगर जि धुळे ) यांना ताब्यात घेतले वाहनात सुमारे २ लाख ५० हजार रुपयाची आठ गुरे कोबलेली होते.

पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून त्यांना चोपडा येथील गोशाळेत रवानगी केली असून तीन जण ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधित अधिनियम १ ९ ६० चे भादवी कलम ११ ( १ ) ( ग ) ( ड ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.या कारवाईत पकडण्यात आलेली गुरे मालकांनी ओळखून घ्यावीत व आपली असल्याची खात्री झाल्यास अमळनेर पोलिसांशी संपर्क साधन्याचे आवाहन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध