Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ.सचिन ओंबासे यांची नियुक्ती...


उस्मानाबाद(राहूल शिंदे) दि.२९ उस्मानाबादचे नूतनजिल्हाधिकारी म्हणून डॉ.सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबत राज्याचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी दि.२९ रोजी आदेश दिले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामविकास प्रकल्प पुणे या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.

उस्मानाबादचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे हे २०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.यापूर्वी ते वर्धा येथे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून होते.पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेज येथून ते एमबीबीएस झाले आहेत. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ही पहिलीच नियुक्ती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध