Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

जागतिक माहिती अधिकार दिन साक्री सह पिंपळनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला



पिंपळनेर- येथील अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर, ग्राहक फाउंडेशन साक्री तालुका व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर .यांच्या संयुक्त विद्यमाने व मा.श्री. कांतीलालजी जैन साहेब अॅड. श्री. चंद्रकांत एशीराव साहेब ,श्री.सुभाषजी बसवेकर साहेब व शाळेचे प्राचार्य बिरारीससर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर येथील कर्मवीर आ.मा. पाटील विद्यालयाच्या हॉलमध्ये दिनांक 28 सप्टेंबर 2022 या दिवशी जागतिक मानवाधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या उपप्राचार्या श्रीमती .माळी मॅडम या होत्या.प्रमुख पाहुणे श्री.हंसराजजी शिंदे, तर प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष प्रविण थोरात हे होते. 

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल महाले सर यांनी केले.याप्रसंगी प्रमुख वक्ते श्री. प्रविण थोरात यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले,भारतीय संविधानाने आपल्याला अनेक कायदे दिलेले आहेत त्या कायद्यात व माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्यातील फरक त्यांनी समजावून सांगितला. इतर कायद्यांचे पालन सामान्य जनता करते ,तर त्या कायद्याची अंमलबजावणी शासकीय अधिकारी करत असतात.मात्र माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्यात मात्र उलट आहे या कायद्याचे पालन शासकीय अधिकारी करत असतात तर त्याची अंमलबजावणी सामान्य जनता करत असते.आमदार,खासदार ,मंत्री यांना माहिती मिळवण्याचा जो अधिकार आहे, तोच अधिकार या कायद्याने सामान्य जनतेला मिळालेला आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता यावी व शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा बसावा, या उद्देशाने या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे.

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याचा हेतू, तसेच कायद्याच्या मुख्य तरतुदी याबाबतची सविस्तर माहिती श्री. प्रविण थोरात यांनी दिली. तसेच शासकीय अधिकारी व जनता या कायद्याबाबत खूप उदासीन असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमा शेवटी श्री धनंजय देवरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. हंसराजजी शिंदे, श्री. रावसाहेब शिंदे ,श्री.प्रमोद शिंदे ,श्री. दिनेश भालेराव, श्री.भरत बागुल, श्री. किरण शिनकर ,श्री.प्रमोद जोशी, श्री. धनंजय देवरे ,श्री.अनिल महाले, श्री. उमेश गांगुर्डे चंद्रशेखर अहिरराव ,श्री.चंद्रकांत अहिराव, श्री. सोमनाथ बागुल यांनी परिश्रम घेतले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध