Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील जैताने गावाला बुराई नदी वरून नळ पाणीपुरवठा योजनेला मिळाली मंजुरी
साक्री तालुक्यातील जैताने गावाला बुराई नदी वरून नळ पाणीपुरवठा योजनेला मिळाली मंजुरी
निजामपूर-जैताणे गावाची जीवनदायिनी असलेल्या बुराई नळ पाणीपुरवठा योजना आपल्या जैताणे गावासाठी मंजूर झालेली आहे जैताणे गावापासून ९किलोमीटर अंतरावरील बुराई मध्यम प्रकल्प या धरणातुन आता जैताणे गावासाठी पाणीपुरवठा होणार आहे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे सदर योजनेमध्ये बुराई धरणा जवळ असलेल्या अस्तित्वातील जॅकवेल पासून अशुद्ध पिण्याची पाण्याची पाईपलाईन घेण्यात येणार आहे तसेच जलशुद्धीकरण केंद्राची संपूर्ण दुरुस्ती प्रस्तावित आहे व जलशुद्धीकरण केंद्रापासून ते गावापर्यंत शुद्ध पिण्याची पाण्याची पाईपलाईन प्रस्तावित आहे तसेच जैताणे गावात नवीन १ लक्ष ६ हजार लिटरचा जलकुंभ, जुन्या जल कुंभाची 3 लाख क्षमतेची दुरुस्ती करणे गावातील वितरण रस्ता टाकण्यात येणार आहे
यासाठी ४,६२,६९,७७२/-रुपयाची ही बुराई पाणीपुरवठा योजना ही मुख्य जलवाहिनी सह गावातील उपजलवाहिनी नवीन पाण्याची टाकी सह लवकरच आपल्या जैताणे गावात कार्यान्वित करण्यात येईल या योजनेसाठी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्याने व जैताणे गावाच्या विकासात प्रयत्नशील असलेल्या साक्री तालुका मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार मंजुळाताई तुळशीरामजी गावित तसेच माननीय श्री तुळशीरामजी गावित यांच्या प्रयत्नाने आज अखेर योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली
तसेच मा प्रशासनाने या योजनेच्या मंजुरी सहकार्य केले
मा शि.छ.निकम अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ,जळगांव, मा अध्यक्ष जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन तथा जिल्हाधिकारी धुळे,मा सह अध्यक्ष जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन तथा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे,मा सदस्य सचिव कार्यकारी अभियंता(ग्रामीण पाणी पुरवठा)जिल्हा परिषद धुळे,मा अजय पाटील उपअभियंता(ग्रा.पा.पु)पंचायत समिती साक्री
या योजनेच्या मंजुरीसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले असे गावातील प्रथम नागरिक सरपंच कविता अशोक मुजगे ,उपसरपंच कविता राकेश शेवाळे,साक्री तालुका पंचायत समितीच्या सदस्या सोनाली बाजीराव पगारे ,पंचायत समितीचे मा सदस्य अशोक मुजगे,ग्रामपालिकेचे गटनेते बाजीराव पगारे,गोकुळ पगारे,रमनबाई चौधरी,सायंकाबाई सोनवणे,गणेश न्याहळदे,संगीता मोरे,शाम भलकारे,राजेश बागूल,जिजाबाई न्याहळदे,अनिता जाधव,सत्तार मणियार,अश्विनी बोरसे,तनुजा जाधव,हिम्मत मोरे,समाधान महाले,सन्मा सदस्य ग्रामपालिका जैताणे तसेच ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड ,वरिष्ठ लिपिक यादव भदाणे,वसुली लिपिक योगेश बोरसे,संगणक परिचालक प्रदीप भदाणे,दिवाबत्ती कर्मचारी अनिल बागूल ,शिपाई रोहिदास साळुंखे यांच्या प्रयत्नाने व सहकार्याने महत्वाची योजनेला मंजुरी मिळाली
सदर योजनेला मंजुरी मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा