Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०२२

शिरपूर तालुक्यातील तोंदे ग्रामपंचायतीत मोठा अपहार असल्याची शक्यता ? ग्रामसेवकाची माहिती पुरवण्यास स्पष्ट नकार..?



शिरपूर प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तोदे ग्रामपंचायत बाबत माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर अहिरराव यांना काहीतरी भनक लागल्याने त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर एकूण सात माहिती अधिकाराचे अर्ज दाखल केले आहेत.२०१७-१८ पासूनचे किर्द बुक व इतर दप्तर, चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत केलेल्या कामांची यादी, सध्या स्थित ग्रामपंचायत सदस्यांनी केलेले अतिक्रमण २४ / २ अधिकृत केलेले जमीनी बाबतची माहिती एन.ए.नसताना तुकाराम नगर बिल शेतीकडे वर्ग केल्याबाबत ची माहिती,तुकाराम नगर मध्ये अटी शर्तीचे उल्लंघन करून झालेले बांधकाम,याच तुकाराम नगर मध्ये ग्रामपंचायत इमारतीचे केलेले बांधकाम,तर सन २०१९-२०२० ते २०२१ २०२२ या आर्थिक वर्षांत ॲक्शन प्लॅन रिपोर्ट नुसार मंजूर झालेली कामे,त्यास शासनाकडून प्राप्त निधी,मात्र सदर कामे न करता काढण्यात आलेला निधी त्यांचा संपूर्ण लेखाजोखा ॲक्शन प्लॅन रिपोर्ट मधील ऑक्टिव्हिटी कोड नंबर व रकमेस माहिती अधिकार अर्ज अंतर्गत त्यासंबंधीची संपूर्ण माहिती मागणी केलेली होती याबाबत जन माहिती अधिकारी यांनी रु. ३१७५/- व रु.३७९/- असे दोन माहिती शुल्क भरण्यास सांगितले होते.

त्यानुसार अर्जदाराने सदर रक्कम त्यांच्या मित्रा मार्फत संबंधित जन माहिती अधिकारी म्हणजे ग्रामसेवक यांच्याकडे देण्यास पाठवले असता जन माहिती अधिकारी यांनी ती घेण्यास स्पष्ट नकार दिला म्हणून इंडियन मनी पोस्टल ऑर्डर द्वारे दोन्ही रक्कम पाठवले असता,जन माहिती अधिकाऱ्याने सदर रक्कम न स्वीकारता त्या इंडियन मनी पोस्टल ऑर्डर परत पाठवली त्यामुळे सदर ग्रामपंचायतीत नक्कीच अपहाराची दाट शंका निर्माण झाली आहे.

म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ नुसार व राज्य माहिती आयोग मुंबई यांच्याकडे शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या परिपत्रकांमुळे माहिती न पुरवणान्या जन माहिती अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाविषयक व निलंबन कारवाई बाबत तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. लवकरच शासन याची दखल घेईल अशी अपेक्षा दिसून येत आहे,

व यातून तोंदे ग्रामपंचायतीत नेमकं दडलंय काय? हे उघड होईल.खरी माहिती समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल असे अर्जदार चंद्रशेखर अहिरराव यांच्याकडून कळविण्यात

(वाचा सविस्तर पुढील अंकात )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध