Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
जायखेडा पोलिसांनी सिनेस्टाईल थरार करून पकडली लाखो रुपयांची विदेशी दारू दोन जणांना केले जेरबंद
जायखेडा पोलिसांनी सिनेस्टाईल थरार करून पकडली लाखो रुपयांची विदेशी दारू दोन जणांना केले जेरबंद
नाशिक प्रतिनिधी: दिनांक १४/१०/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजेचे सुमारास जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की एक महिंद्रा कंपनीची XUV 500 कार वाहन क्रमांक GJ-19 AA-3388 या वाहनातून दोन इसम विनापास परमिटाशिवाय अवैधरित्या विविध प्रकारच्या विदेशी दारूच्या बाटल्यांची वाहतूक करून पिंपळनेर कडून ताराबाद कडे येत आहे अशी माहिती मिळाल्यावर त्यांनी लागलीच ताराबाद पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांना अधिनस्त पोलिस अंमलदार यांचे एक पथक बनवून ताराबाद गावातील अंतापुर चौफुलीवर सापळा लावण्याबाबत आदेशित केल्याने पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी त्यांचे समवेत पोलीस हवालदार गोपीनाथ भोये पोलीस हवालदार सुनील पाटील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पवार व होमगार्ड राकेश नवसार अशांचे पथक तयार करून अंतापुर चौफुलीवर सापळा लावला असता आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास मिळालेल्या बातमी प्रमाणे वरील नमूद वाहन क्रमांकाची कार पिंपळनेर कडून ताराबाद कडे येत असताना पोलीस उपनिरीक्षक रसाळ व पथकाने सापळा लावून अंतापुर चौफुली येथे जागीच पकडण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालक व त्याचा सोबतचा भरधाव वेगाने वाहन चालवण्याचा प्रयत्न करत असताना तहराबाद गावातील व करंजाड गावातील ग्रामस्थांनी पोलिसांची मदत करून नमूद संशयित कार पकडण्यासाठी पोलिसांना योग्य ती मदत केली.
त्यानंतर पोलिसांनी नमूद कार मधील वाहन चालक व त्याचे असणाऱ्या इसमांना कारमधून बाहेर काढून विचारपूस केली असता ते उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने पोलिसांनी सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी दारूच्या दारूबंदी गुन्ह्यांचा सुमारे १,५७,०१० /- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी सदरचा मुद्देमाल व सुमारे १० लाख रुपये किमतीची कार असा एकूण ११,५७,०१०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदरच्या कार वरील *वाहन चालक किसन लक्ष्मण गाणी वय ३० वर्षे राहणार धरम नगर रोड, सुरत (गुजरात राज्य) व त्याचे सोबतचा इसम उमेश किसन यादव वय 28 वर्षे राहणार नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 अ,ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वर नमूद दोन्ही इसमांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास मा.वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ हे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा