Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
सी.एम.भोई यांची अखिल भारतीय भोई समाज सेवा संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड
सी.एम.भोई यांची अखिल भारतीय भोई समाज सेवा संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड
शिरपूर प्रतिनिधी:भोई समाज सेवक म्हणून शिरपूर जिल्हा धुळे येथील श्री.सी.एम भोई सर गेल्या 30 वर्षांपासून अतिशय प्रामाणिक पणे समाज सेवेचे काम करत आहेत. त्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने शिरपूर येथील भोई समाजाचे उत्तम काम सुरू आहे.आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यात त्यांच्या सिहाचा वाटा आहे.
वधू-वर परिचय मेळावे,विवाह मेळावे,
गुणगौरव सोहळे,जयंती उत्सव, तंटामुक्त समितीचे खूप गौरवास्पद त्यांची कामगिरी राहिली आहे.त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत आखिल भारतीय भोई समाज सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.ए.के.भोई यांनी श्री.सी.एम.भोई संराना धुळे,नंदुरबार व नाशिक या तीनही जिल्यांचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष पदी निवड झाल्याचे प्रमाणपत्र बहाल केले.
त्यावेळी उपस्थित भोई समाज आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.भाईदास भोई,उपाध्यक्ष श्री.गुलाब भोई, तंटामुक्ती अध्यक्ष,शैक्षणिक गुणगौरव समितीचे अध्यक्ष श्री रविंद्र सोनवणे, शहराध्यक्ष श्री भोजराज भोई,यशवंत निकवाडे,सुदाम मूवीज चे एम.डी.श्री जगदीश मोरे,तरुण गर्जणाचे संपादक संतोष भोई,मनोज भोई,अजय भोई,राज भोई,शरद मोरे,भरत मोरे,अभिमन मोरे,जगन्नाथ ढोले व ईतर समाज बांधव उपस्थित होते.या निवडीबद्दल सर्व समाज बांधवांनी सरांचे अभिनंदन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
साक्री प्रतिनिधी / साक्री पांझरा कान साखर सह. कारखान्याच्या आवारात भव्य असा शेतकरी मेळावा घेण्यात आला या यावेळी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा