Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

गो तस्करी करणाऱ्यांना ‘या’ राज्याने दिला दणका; जप्त करण्यात आलेल्या मांसाची प्रयोगशाळेत चाचणी केली जाणार



गो तस्करी करणाऱ्यांना ‘या’ राज्याने दिला दणका; जप्त करण्यात आलेल्या मांसाची प्रयोगशाळेत चाचणी केली जाणार

मुंबई प्रतिनिधी : देशात विविध राज्यात दरदिवशी गो तस्करीच्या घटना उजेडात येतात. याअंतर्गत अनेकजणांना आजवर बेडया देखील ठोकण्यात आल्या आहे, परंतु काही तस्करी करणारे हे कायद्याला न जुमानता सराईतपणे गो तसेच गोमांस तस्करी करतात.नेमका अशाच गुन्हेगारांवर येत्या काळात वचक बसविण्यासाठी महाराष्ट्राचे शेजारी राज्य असलेल्या गुजरातने भन्नाट तोडगा शोधला आहे.

पोलिसांच्या तपासणीतून अनेकदा मांस जप्ती करण्यात येते त्यामुळे जप्त केलेले मांस हे नेमके कुठल्या प्राण्याचे आहे याबाबत संभ्रम निर्माण होत असतो,परिणामी कारवाई करताना पोलिसांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे तपास प्रक्रियेला गती देण्याच्या तसेच पोलिसांचे कार्य सुगम करण्याच्या दृष्टीने गुजरात राज्य जप्त करण्यात आलेल्या मांसाची प्रयोगशाळेत तपासणी करणार आहे,याबाबतीत नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.

मांस तपासणीला लॅम्प डीएनए चाचणी असे नाव असून हा अभिनव निर्णय घेणारे गुजरात हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.ही चाचणी अत्यंत सोपी असणार आहे तसेच केवळ एक तासाच्या कालावधीत मांस नेमके कुठल्या प्राण्याचे आहे याबाबत खात्रीशीर अहवाल प्राप्त होणार आहे. यामुळे गो तस्करांना चांगलाच दणका गुजरात सरकारने दिला आहे.

अनेकदा गो तसेच मांस तस्करी करणारे एकाच वेळी विविध प्रकारच्या मांसाची तस्करी करतात त्यामुळे या चाचणीमुळे सर्व काही उघड होणार आहे.नेमके कुठले मांस वाहतूक केल्या जात आहे व हे गो मांस तर नाही ना याबतीत पोलीस यंत्रणांना तपासावेळी या चाचणीच्या अहवालाद्वारे मोठी मदत मिळणार आहे.जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर देशातील अन्य राज्यात देखील ही पद्धत लागू केली जाऊ शकते, कारण गोवंश तस्करी हा देशात मोठा गुन्हा समजल्या जातो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध