Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
आझाद मैदान मुंबई येथे,आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांसाठी लाक्षणिक धरणे आंदोलन
आझाद मैदान मुंबई येथे,आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांसाठी लाक्षणिक धरणे आंदोलन
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलनाचे आयोजन माया परमेश्वर अध्यक्षा ,रामकृष्ण बी.पाटील कार्याध्यक्ष, युवराज बैसाणे
उपाध्यक्ष,सुधिर परमेश्वर कोषाध्यक्ष,
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने दिनांक १७ ओक्टोम्बर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता,आझाद मैदान मुंबई येथे,आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांसाठी लाक्षणिक धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्मचारी प्रतिनिधी येणार आहेत.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या खालीलप्रमाणे
1) राष्ट्रीय आयोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या महत्वपूर्ण कामाचा विचार करून त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन वेतन व सेवेचे फायदे लागू करण्यात यावेत किंवा किमान वेतन कायद्यानुसार आशा स्वयंसेविकांना दरमहा १८०००/- रुपये आणि गटप्रवर्तकांना दरमहा २५००० /- रुपये किमान वेतन लागू करण्यात यावे.
2) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय निश्चत करून सेवानिवृत्तीनंतर त्यांना दरमहा ६००० /- रुपये सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे.
3) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकान प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचे तंतोतंत लाभ लागू करण्यात यावेत.
4) आशा स्वयंसेविकांना कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त तसेच गटप्रवर्तकांना प्रवासभात्या व्यतिरिक्त दरमहा भरीव स्वरूपाचे निश्चित मानधन लागू करण्यात यावे.
5) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दरवर्षी ५०००/- रुपये भाऊबीज भेट देण्यात यावी.
6) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मिळणाऱ्या मोबाईल सिमकार्ड रिचार्ज व सादील खर्चाच्या रकमेत वाढ करण्यात यावी.काम सोईचे होण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविकांना अद्ययावत व जास्त क्षमता असलेले मोबाईल तसेच गट प्रवर्तकांना विनामूल्य लॅपटॉप पुरविण्यात यावेत.
7) राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अर्थसंकल्पीय निधीमध्ये कपात न करता भरीव स्वरूपाची वाढ करण्यात यावी.
8) राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कोणत्याही परिस्थितीमध्ये खाजगीकरण करण्यात येऊ नये.
9) राष्ट्रीय आरोग्य अभियानाची मुदत दर ५ वर्षांनी ना वाढविता सादर अभियानाचे कायमस्वरूपी योजनेत रूपांतर करून अखंडपणे सुरु ठेवण्यात यावे.
10) आशा स्वयंसेविकांना कामाचा मोबदला ६-६ महिने संबंधित अधिकारी अदा करीत नाहीत. त्यामुळे आशा स्वयंसेविका व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येत आहे.म्हणून आशा स्वयंसेविकाना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला दरमहा अदा करण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांना आदेशित करावे.
11) आदिवासी भागातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासनाने सायंकाळी पुरविल्या आहेत. परंतु ग्रामीण आणि नागरी भागात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मात्र सायकली पुरविण्यात आलेल्या नाहीत.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सायंकली पुरविताना आदिवासी व ग्रामीण असा भेदभाव ना करता सरसकट राज्यातील सर्व विभागात कार्यरत आशा व गटप्रवर्तकांना सायंकली पुरविण्यात याव्यात.
12) आशा स्वयंसेविकाना सध्या कामावर आधारित देण्यात येणाऱ्या मोबदल्याची दर महागाईचा विचार करून तिपटीने वाढविण्यात यावेत.
13) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकान दरवर्षी गणवेशाची (२ साड्या) १२००/- रुपये शासनातर्फे अदा केले
जातात.परंतु सदरची रक्कम कमी असून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाना गणवेशाची दरवर्षी २०००/ रुपये देण्यात यावे.
(14) दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील असा कामाचा भेदभाव न करता आशा स्वयंसेविकाना प्रत्येक बाळंतपणासाठी सरसकट मोबदला देण्यात यावा.
15 ) नागरी, ग्रामीण व आदीवासी विभागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना लाभाथ्यांकरीता आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आरोग्य किट देण्यात यावे. तसेच अशा स्वयंसेविकांना व गट प्रवर्तकांना कामकाजासाठी लागणारी स्टेशनरी, रजिस्टर आदी साहित्य शासनाकडून त्वरित पुरविण्यात यावेत.
16) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकानी कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता योगदान दिलेले आहे. सदर योगदानाचा विचार करूनत्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने आरक्षण देण्यात यावे.
यासह अन्य प्रलंबित मागण्यां सविस्तर चर्चा करून त्या सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी दिनांक १७ ओक्टोम्बर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे प्रमुख प्रतिनिधी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहेत.तरी परिस्थिती या थराला जाऊ ना देता आशा स्वयंसेवीका व गटप्रवर्तकांच्या वरील प्रश्नांवर चर्चा करून सोडविण्यात यावे या बाबत आपल्या कार्यालयाने केलेल्या कारवाईची माहिती संघटनेला लेखी स्वरूपात कळवावी हि विनंती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा