Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२
*संभाजी ब्रिगेड साक्री तालुका अध्यक्षपदी श्री.अनिल दादा देसले यांची नियुक्ती*
संभाजी ब्रिगेड चे विभागिय अध्यक्ष हेमंतभाऊ भडक यांच्या अध्यक्षतेखाली जुने नवे कार्यकर्ते, नवीन पक्ष प्रवेश इच्छुक कार्यकर्ते यांच्या शी संवाद साधून संघटन मजबूत करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील तालुका शाखा अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या शी संवाद साधून संपर्क अभियान राबविले जात आहे.आज दिनांक १६/१०/२०२२ रोजी साक्री ता बैठक घेण्यात आली,या बैठकीस जिल्हा अध्यक्ष मनोहर पाटील यांनी प्रस्तावना केली, संघटना स्थापन पासुन तर आज पर्यंत केलेल्या कार्याचा आढावा सांगितला.विभागिय अध्यक्ष हेमंतभाऊ भडक यांनी आगामी जिप पंस, ग्राम पंचायत निवडणुकीत तयारी करव्याचे दृष्टीने मार्गदर्शन केले, सर्व जुने नवे शाखांशी संपर्क साधून त्यांना संघटन मजबुत करावे,साक्री तालुका अध्यक्ष पदी मा. शिवश्री अनिल देसले यांची नियुक्ती करण्यात आली,अनिलदादा माजी पंचायत समिती सदस्य असून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र विभागिय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.संपुर्ण नवीन कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश केला.या बैठकिस मराठा सेवा संघ चे तालुका अध्यक्ष मा.बी.एम.भामरे अण्णा, जिल्हा उपाध्यक्ष मा.दिपक नांद्रे, मा.ज्ञानेश्वर अहिरे, वधु वर सुचकचे म.अनिल अहिरे, मा.सुभाष नांद्रे, मा.प्रविण बोरसे(अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश मुख्य सेक्रेटरी), छडवेलचे सरपंच मा. सचिन पाटील(जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती), भैयासाहेब. भिमराव पारधे(अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती पिंपळनेर मंडल अध्यक्ष), मा.रविंद्र ठाकरे माजी पं समिती सदस्य( जिल्हाध्यक्षआदिवासी सेल), व आदी पदाधिकारी उपस्थित होते.बैठकिचे शेवटी धुळे महानगर सचिव सुनिलभाऊ ठाणगे यांनी आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
भिकेश पाटील यांच्या पुढाकाराने कळंबू ते मुडी रस्ता झाला मोकळा "वाहनधारकांचा प्रवास सुकर" अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा