Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५
भिकेश पाटील यांच्या पुढाकाराने कळंबू ते मुडी रस्ता झाला मोकळा
भिकेश पाटील यांच्या पुढाकाराने कळंबू ते मुडी रस्ता झाला मोकळा
"वाहनधारकांचा प्रवास सुकर"
अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील कळंबू ते मुडी रस्त्यावरील वाढलेली काटेरी झुडपे आणि गवत भिकेश पाटील यांच्या तातडीच्या पुढाकाराने काढण्यात आल्यामुळे परिसरातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कार्याबद्दल ग्रामस्थांनी भिकेश पाटील यांचे कौतुक केले आहे.
कळंबू, मुडी, बोदर्डे आणि मांडळ लोन या चार गावांना जोडणाऱ्या या मुख्य रस्त्याच्या बाजूला काटेरी बाभूळ, वळणांवर आलेली झाडे आणि पावसाळ्यामुळे वाढलेल्या गवतामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला होता. यामुळे वाहनधारकांना तसेच बैलगाडीने शेतीत जाणारे शेतकऱ्यांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत होता.सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अखत्यारीत येत असल्यामुळे या समस्येबद्दल
वृत्तपत्रांमार्फत माहिती देण्यात आली होती, तरीही या कामाकडे विभागाचे दुर्लक्ष झाले होते.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत कळंबू गावातील संजू कोळी (भिकेश पाटील समर्थक) यांनी थेट भिकेश पाटील यांना फोन करून रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. ही विनंती मिळताच भिकेश पाटील यांनी कोणताही विलंब न लावता तात्काळ जेसीबी पाठवून संपूर्ण रस्त्याच्या कडेची काटेरी झुडपे आणि अनावश्यक गवत काढून टाकले.
रस्ता मोकळा झाल्याने या भागातील वाहतूक आता सुरक्षित झाली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी जनहिताचे काम केल्याबद्दल भिकेश पाटील यांचे आभार मानले आणि कौतुक केल.
उपसंपादक:- गणेश चव्हाण
मो.7972821434
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा