Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२
शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई गावठी पिस्टल व मॅक्झिन सह एकास अटक एक फरार
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपनीय बातमी द्वारे माहिती प्राप्त झाली होती
इसम नामे समीर गफ्फार शेख रा अबिकानगर शिरपुर जि धुळे व त्याचे सोबत भु-या शेख रा.कुंभारटेक शिरपुर असे दोघेजण मोटार सायकलीवर त्याचे कब्जात बेकायदेशिर रित्या देशी बनावटीचे पिस्टल बाळगुन शिरपुर फाटयावर येत असल्याबाबत गोपनीय बातमी प्राप्त झाली होती.
मिळालेल्या माहितीवरून तात्काळ पोलीस पथकाची नियुक्ती करून छापा टाकण्यासाठी त्यांनी पथकास आदेश केले.पोलीस पथक व पंच असे खाजगी वाहनाने बातमीची ठिकाणी शिरपुर फाटयावर जावुन तेथे सापळा लावला असता एक हिरो कंपनीची सप्लेन्डर प्लस काळया रंगाची मोटार सायकल वर दोन इसम त्यातील एक इसमाने अंगात काळया रंगाचा शर्ट व मागे बसलेल्या इसमाने अंगात लाल रंगाचे स्वेटर घातलेला असे शिरपुर शहराकडून शिरपुर फाटयावर येत असतांना ते बातमीमधील इसम असल्याचे दिसल्याने त्यांना थांबण्यास सांगितले असता ते तेथे न थांबता शिरपुर टोल नाक्याचे दिशेने जावु लागले. त्यांचा पाठलाग करुन त्यांना पालवी हॉटेलच्या अलीकडे मुंबई आग्रा महामार्गावर १८.१५ वाजेचे सुमारास पकडले.तेव्हा मोटार सायकली वर मागे बसलेला इसम उडी मारुन पळुन गेला. पकडलेल्या इसमास सोबतचे पंचासमक्ष त्याचे नाव गांव विचारता त्याने त्याचे नाव समीर गप्फार शेख वय २४ रा अंबिकानगर शिरपुर जि धुळे असे सांगितले.त्यास पळुन गेलेल्या इसमाचे नाव गांव विचारता त्याने त्याचे नाव भुया उर्फ हुसेन शेख लतिफ मन्यार रा कुंभारटेक शिरपुर असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचेकडे पोटाजवळ पेंन्टमध्ये उजवे बाजुस एक देशी बनावटीचे पिस्टल खोचलेले मिळून आले तिची मॅगझीन काढून पाहता तिचेत दोन जिवंत काडतुस असल्याचे दिसले. पकडलेल्या इसमास त्याचे कडे पिस्टल वापरण्याचा परवाना आहे काय याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले त्याचेजवळ मिळून आलेली पिस्टल व तिचे मॅगझीन मध्ये मिळुन आलेले जिवंत काडतूस व मोटार सायकल असे पंचासमक्ष ताब्यात घेतले. त्याच्याकडून
१) २०,०००/- रुपये किंमतीचे एक स्टिलचे लोंखडी देशी बनावटीचे पिस्टल तिस चॉकलेटी रंगाची फायबरची मूठ असलेले मॅगझीन
२) २०० /- रुपये किमतीची दोन जिवंत काडतुस त्यावर इंग्रजीत के एफ ७.६५ असे कोरीव असलेले
३) ५०,०००/- रु. कि. ची हिरो कंपनीची सप्लेन्डर प्लस काळया रंगाची व पिवळे व नोरगी रंगाचे पट्टे ,असा रू.७०,२००/-रुपये अंदाजे मुद्देमाल मिळून आला.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मुकेश गीलदार पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
भिकेश पाटील यांच्या पुढाकाराने कळंबू ते मुडी रस्ता झाला मोकळा "वाहनधारकांचा प्रवास सुकर" अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा