Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
परतीच्या पावसामुळे ऊस गाळप हंगाम लांबणीवर पडणार,ऊसात पाणी आसल्याने ताेडणीवर परिणाम.......
परतीच्या पावसामुळे ऊस गाळप हंगाम लांबणीवर पडणार,ऊसात पाणी आसल्याने ताेडणीवर परिणाम.......
महाराष्ट्रात परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या तिसऱया आठवडय़ापर्यंत बरसत राहील,असा हवामान खात्याचा अंदाज आहे.शिवाय ऊसपिकात अद्यापही पावसाचे पाणी साचून असल्याने १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणारा ऊसगळीत हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील साखर कारखान्यांचा ऊसगळीत हंगाम १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार आहे.
या पार्श्वभूमीवर गाळपासाठी साखर कारखाने सज्ज झाले आहेत.
तसेच, काही साखर कारखान्यांची छोटी-मोठी कामे सुरू आहेत.
राज्यात यावर्षी १४.८७ लाख हेक्टर उसाचे क्षेत्र आहे.यावर्षीही ऊसलागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादनदेखील वाढणार आहे.
यंदा १ हजार ४४३ लाख टन उसाचे गाळप होणार आहे.यावर्षी ऊसउत्पादकता ही ९५ टन हेक्टरी आहे.तर यंदा १५० लाख टन साखरेचे उत्पादन होणार आहे.
मात्र,यातील १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात येणार आहे.
त्यामुळे १२ लाख टन साखर कमी उत्पादित होणार आहे.यंदा साखरेचे उत्पादन हे १३८ लाख टन होणार असल्याचा अंदाज आहे.
यावर्षीच्या गळीत हंगामात २०० हून अधिक सहकारी आणि खासगी साखर कारखाने सुरू होणार आहेत.
यंदा काही बंद असलेले कारखाने सुरू होत असल्यामुळे ऊस लवकर गाळपासाठी मदत होणार आहे.
यावर्षी सरासरी साखर उतारा हा ११.२० टक्के असणार आहे.
यावर्षीचा उसाचा गाळप हंगाम हा १६० दिवसांचा असणार आहे.
मागील वर्षीचा गळीत हंगाम हा १७३ दिवस चालला होता.
११९ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होणार.....
यंदा इथेनॉलच्या उत्पादनातदेखील मोठी वाढ होणार आहे.यंदा राज्यात ११९ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होईल.तर पुढच्या वर्षी म्हणजे २०२३-२४ मध्ये १४० कोटी लिटरहून अधिक इथेनॉलनिर्मिती होईल.
साखर कारखान्यांचा येणाऱया काळात इथेनॉलनिर्मितीवर भर देण्याचाही प्रयत्न असेल.
एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत हंगाम चालणार....
यंदाचा ऊसगळीत हंगाम हा मार्चच्या शेवटपर्यंत किंवा फार फार तर एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत चालेल,अशी आशा आहे.
मागील वर्षी इतका उसाचा गळीत हंगाम यंदा लांबणीवर पडणार नाही.
यंदा कारखान्यांची संख्याही वाढली आहे.तसेच, दुसरे कारण म्हणजे यंदा खोडवा उसाचे क्षेत्र जास्त आहे,
त्यामुळे उसाचे टनेज कमी होणार आहे.
६० साखर कारखान्यांकडे ३०० कोटींची थकबाकी.....
गेल्या हंगामात ऊस गाळप केलेल्या ६० साखर कारखान्यांकडे एफ.आर.पी. थकीत आहे.जवळपास ३०० कोटी रुपयांची शेतकऱयांची एफ.आर.पी. कारखान्यांकडे थकीत आहे.
शेतकऱयांची थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत कारखाना सुरू करण्यासाठी परवाना देणार नसल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात येते.
मात्र, १५ ऑक्टोबर २०२२ च्या आत राहिलेले साखर कारखाने थकीत एफ.आर.पी. देतील,असाही अंदाज आहे.एफ.आर.पी. दिली नाही तर त्यांना साखर कारखाना सुरू करता येणार नाही,तरीही कारखाना सुरू केला,तर त्या कारखान्याला प्रतिदिन दंड आकारला जाणार आहे.
ऊसतोड मजुरांसमोर लम्पीचे संकट......
राज्यात सुरू होणाऱया साखर गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारखान्यांकडे ऊसतोड मजुरांकडील बैल-गाय व इतर गोवंशीय पशुधनास लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाचे संकट साखर उद्योगासमोर आहे.
लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये,
यासाठी लसीकरण करण्यात आलेल्या पशुधनाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
साखर कारखान्यात रुग्णवाहिका, औषधसाठा उपलब्ध असणेही आवश्यक आहे.तसेच, चेकपोष्ट तयार करून तपासणी करण्यात यावी. स्थानिक पातळीवर महसूल, ग्रामविकास आणि पशुसंवर्धन विभागांना समन्वय ठेवून काम करावे लागणार आहे.
साखर कारखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक राहील.
त्यांनी संबंधित जनावरांच्या लसीकरणाची खात्री करावी.
बाधित जनावर आढळल्यास विलगीकरण करून त्यावर औषधोपचार करावा.सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर येथे एका तरुणाने 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये असलेल्या युवतीसोबतचे नाते तुटल्यामुळे संतापातून तिचे आक्षेपार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा