Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरील दाखल करण्यात पुराव्यासह तपास करूनच कारवाई करा - माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ ची मागणी



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या व माहिती अधिकार कार्यकर्ता डॉक्टर सरोज पाटील यांच्यावर दिनांक 17 ऑक्टोबर रोजी मागील भांडणाची कुरापत काढून खंडणी मागितल्याच्या आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दाखल गुन्ह्यात पुराव्यासह तपास केल्यानंतरच पुढील कारवाई करावी अशी मागणी धुळे जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्याकडून पोलीस निरीक्षक शिरपूर यांच्याकडे करण्यात आले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की आम्ही माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबई या महासंघाचे धुळे जिल्हा व शिरपूर तालुक्याचे पदाधिकारी असून या तालुक्यात माहिती अधिकार कायद्याचे संरक्षण व संवर्धन व माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती करण्याचे व कार्यकर्त्यांवरील अन्याय अत्याचाराबाबत लढा देण्याचे काम संघटना करत असते.

शिरपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता डॉक्टर सरोज पाटील यांच्यावर दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा हा खोटा गुन्हा असून याद्वारे माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या आवाज दाबण्याच्या प्रयत्न केला गेला आहे असे प्रथम दर्शनी दिसत आहे.

याबाबतीत घडलेला घटनाक्रम हा मागील चार महिन्यापूर्वीच्या असून याबाबत डॉक्टर सरोज पाटील यांनीच फिर्याद करतांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र सदरच्या गुन्हा मागे घेण्यासाठी मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे आम्हास वाटते. आमच्या पोलीस प्रशासनावर व त्यांच्या कर्तव्यावर विश्वास असून आपल्याकडून चुकून निर्दोष व्यक्तीवर अन्याय होणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात येईल म्हणून आपण सदर गुन्ह्याची सत्यता व सखोल चौकशी व भक्कम पुरावे प्राप्त करूनच दोषींवर कारवाई करावी असे आपणास विनंती करण्यात येत आहे.

सदरच्या निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम शेटे,जिल्हा संघटक महेंद्रसिंग जाधव, जिल्हाध्यक्ष पूनमचंद मोरे,व इतर पदाधिकारी माधव फुलचंद दोरीक,संतोष भोई,डॉक्टर हिरालाल चौधरी,तसेच या गावातील नागरिक प्रशांत चौधरी ,संदीप राजपूत,चंद्रकांत गिरासे शिवाजीराव बोरसे इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध