Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

भोईसमाज युवा मंच च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदि पुन्हा एकदा श्री तुषार सोमनाथ साटोटे यांची निवड



नाशिक प्रतिनिधी:काल दि.२६.१०.२०२२ रोजी भाऊबीजेच्या शुभ मुहृर्तावर भोईसमाज युवा मंच च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदि श्री तुषार सोमनाथ साटोटे यांची पुन्हा निवड करण्यात आली,समाजकार्यात आवड असणा-या श्री तुषार साटोटे यांनी वयाच्या १८ व्या वर्षापासुन नाशिक मधिल भोईसमाजाचे जेष्ठ समाजसेवक यांच्या कार्यांच्या प्रेरणेतुन आपले समाजिक कार्य सुरु केले,सातपुर विभाग अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष पर्यंत प्रवासात भोईसमाज रोजगार तथा व्यवसाय,शैक्षणिक मार्गदर्शन, महिला सक्षमिकरण, विविध सांस्कृतिक कार्यक्रम,वधुवर परीचय मेळावा, भोईसमाज युवा मंच दिनदर्शिका, दरवर्षी राष्ट्रसंत भिमा भोई जयंती उत्सव साजरी करुन समाज एकसंघ करणे अशा विविध उपक्रमात त्यांचे महत्वाचे योगदान लाभले असुन या त्यांच्या विविध कार्याची दखल घेत भोईसमाजातील विविध संघटनांनी त्यांच्यासह सर्व टीमला दोन वेळेस  समाज गौरव पुरस्कारानेहि समान्नित केले आहे, सद्धा त्यांच्याकडे आदर्श भोईसमाज बहुउद्देशिय संस्था सातपुर(रजि) चे अध्यक्ष तथा नाशिक भोईसमाज सेवा संस्था नाशिक चे सल्लागार म्हणुन जबाबदारी आहे ती ते पार पाडत आहेत.
             
समाजकार्यात आल्यापासुन मनाशी बाळगुण असलेल्या मोठ्या स्वप्नपुर्तीची जी गेल्या १२ वर्षानपासुन ते पहात होते तो ते वेळोवेळी पाठवपुरावा करत मार्गी लावण्यात यशस्वी झालेत ते म्हणजे राष्ट्र संत भिमा भोई यांचे महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र मंदिर जाचे भूमिपुजन नुकतेच पार पडले, अशा विविध कार्यातुन समाजात आपली आगळी वेगळी अोळख निर्माण करणारे श्री तुषार सोमनाथ साटोटे यांच्या वर पुन्हा एकदा भोईसमाज युवा मंच प्रमुख श्री ज्ञानेश्वर खैरमोडे, कोअर कमेटी अध्यक्ष श्री किशोर शिवदे सर, कोअर कमेटी उपाध्यक्ष श्री संजयजी इंगळे, कोअर कमेटी सचिव श्री महारु शिवदे, कोअर कमेटी प्रवक्ते श्री निलेश वाडिले यांनी विश्वास दर्शवुन त्यांच्या वर पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात अली असुन कोअर कमेटी अध्यक्षांच्या वतिने त्यांची नियुक्ति जाहिर करण्यात आली,वरीष्ठांनी जो विश्वास ठेऊन हि जबाबदारी दिली ती ते निष्ठेने तथा जोमाणे पार पाडण्याचा प्रयत्न करेल असे श्री तुषार सोमनाथ साटोटे यांनी सांगितले, महाराष्ट्र च्या विविध भागातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असुन सर्व समाज बांधवांचे त्यांची आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध