Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
रेशन मध्ये दिवाळी निमित्ताने आनंदाची शिधा योजने अंतर्गत अपूर्ण वस्तूंचे वाटप साक्री तालुक्यात होत असल्याने पालक मंत्री यांनी तात्काळ दखल घ्यावी
रेशन मध्ये दिवाळी निमित्ताने आनंदाची शिधा योजने अंतर्गत अपूर्ण वस्तूंचे वाटप साक्री तालुक्यात होत असल्याने पालक मंत्री यांनी तात्काळ दखल घ्यावी
धान्य वितरणाची योजना राबविण्या अगोदर सुसज्ज यंत्रणा आवश्यक. भारताला स्वातंत्र्य मिळाल्य नंतर देशात " रामराज्य " असाव अस राष्ट्र पीता महात्मा गांधी यांची संकल्पना होती. रामराज्य यांचा अर्थ देशातल्या तळा गाळातील, दुर्बल घटकाला समाधानी व्रुत्तीने जगता आले पाहिजे. त्यासाठी त्याला पोटभर अन्न् मिळायला हव.या ऊदात्त हेतूने ,तत्कालीन काँग्रेस प्रणीत केंद्र शासनाने , संपूर्ण देशात ,गोर गरीबांना स्वस्त दरात धान्य ऊपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली राबविण्याचा महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतला. गेल्या 70 वर्षा पासून देशात ही कल्याणकारी योजना राबविली जात
आहे संपूर्ण जगात ही सार्वजनिक वितरण प्रणाली नावारुपाला आली आहे. जगातल्या अनेक देशांनी या कार्यप्रणालीची प्रशंसा करित आपल्या देशातही कार्यरत करण्याचा प्रयत्न केला आहै. संपूर्ण जगात ,कोरोना ने हाहाकार माजवला होता , भारतही त्याला अपवाद नव्हता पण, सार्वजनिक वितरण प्रणाली मुळे.भारत संपूर्ण जगात, कोरोनाशी सामना करण्यात अग्रेसर ठरला. कोरोनाच्या महामारीत सार्वजनिक वितरण प्रणालीने आरोग्य यंत्रणेबरोबर खांद्याला खांदा लाऊन योगदान दिले.अशी महत्वपूर्ण योजना गेल्या तीन चार वर्षाच्या कालखंडात सु नियोजना अभावी बदनाम होऊ पहात आहे कांही स्वार्थाध दुकानदार या योजनेचा गैर फायदा घेत असल्याचे सागत शासनाने, अत्याधुनिक यंत्र सामुग्रीच्या आधारे ही प्रणाली कार्यरत करण्याचा निर्णय घेतला. निर्णय चागला होता पण त्याची अमंलबजावणी करणारी यंत्रणा नसल्याने व दुकानदारांना अगोदर प्रशिक्षण दिले न गेल्याने सुरवातीला दुकानदारांना व ग्राहकांना खुप मनःस्ताप सहन करावा लागला. आजही कारण परत्वे पाँझ मशिन काम देत नाही तेव्हा दुकानदाराची गैर सोय होतेच. पण वेळेवर ग्राहकांना धान्य न मिळाल्याने हाल होत आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शंभर रुपयात रवा, तेल, चना दाळ आणी साखर देण्याचा निर्णय शासनाने सर्व कार्ड धारकासाठी घोषीत केला . पण पर्याप्त नियोजना अभावी ही योजना पुर्णतः फसली. दिवाळीच्या सण संपूर्ण महाराष्ट्रात पॉज मशिनने दगा दिला. शिवाय दिवाळी पंर्यत मालाचाच पुरवठा झाला नाही. घाई गर्दीत ,साखरेचा पूरवठा झालाच नाही. काही ठीकाणी दाळ उपलब्ध झाली नाही. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यात खटके ऊडून दिवाळी कडू झाली. वेळेवर पुरवठा न होण्याचे मुख्य कारणही मनःस्ताप देणारे होते ज्या थैली मधुन हे धान्र द्यायचे होते त्या थैल्यांवर.पंतप्रधान मोदीजी, मुख्यमंत्री शिंदे जी आणि उप मुख्यमंत्री फडणविस जी यांचे फोटो छापले गेले नव्हते.ते छापले गेल्यावर पीशव्या उपलब्ध झाल्यात त्यात दिवाळी ऊजाडली. प्रत्यक्षात साखर न देताच 100 रुपये घेण्यात आले. साखरे अभावी दिवाळी गोड होण अशक्य ती कडू झाली आणि योजना फसली. शंभर रुपये घेऊनही रवा, चनाडाळ,तेल साखर या वस्तूंपैकी पूर्णतः वाटप होत नसताना शंभर रुपयाची वसुली मात्र होत आहे सदर बाब अत्यंत अन्यायकारक आहे साखर व तेल जिल्ह्यातच उपलब्ध नसल्यामुळे पैशांची वसुली थांबवण्यात यावी ज्या ज्या नागरिकांना चार वस्तूंपैकी अपूर्ण वस्तू मिळाले असल्यास त्यांचे पैसे परत करण्यात यावे ही नम्र विनंती यावेळी केली यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे धुळे जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी आनंद शिधा वाटप या योजने अंतर्गत साखरं व गोड तेल होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले व नागरिकांकडून 100 रुपये वसुल केले जात आहे शासन पूर्ण वस्तू देत नाही वरून 100 रुपये वसुल करीत आहे सदर बाब मंत्री महोदयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ही याबाबत सकारात्मक असा प्रतिसाद दिला व या योजनेबद्दल खंत ही व्यक्त केली सदर योजनेच्या संदर्भात घाई झाल्यामुडे अडचणी निर्माण झाल्या आहेत परंतु शासन निश्चित सर्व वस्तू जनतेपर्यंत निश्चित पोहचेल. गोडेतेल मिळत नव्हते परंतु गौतम अडाणी यांनी तेल उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्री महाजन म्हणाले.
AVB माझा न्युज चॅनल सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा