Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्रात प्रथमच डिझेल बुलेटला सेल स्टार्ट व रिमोट कंट्रोल वर करण्याचा रवि भोई यांचा अशक्यप्राय प्रयत्नास यश शिरपूर शहरात रवी भोई यांच्या डिझेल बुलेटची सर्वत्र चर्चा
महाराष्ट्रात प्रथमच डिझेल बुलेटला सेल स्टार्ट व रिमोट कंट्रोल वर करण्याचा रवि भोई यांचा अशक्यप्राय प्रयत्नास यश शिरपूर शहरात रवी भोई यांच्या डिझेल बुलेटची सर्वत्र चर्चा
शिरपूर : भारतात देसी जुगाड करणाऱ्या लोकांची संख्या खूपच मोठी आहे.काही हौशी लोक काहीना काही जुगाड सतत करत असतांना आपण पाहत असतो. तर काही व्यक्ती पैसा वाचवण्याच्या प्रयत्नात काही ना काही तडजोड करून सुद्धा जुगाड निर्माण करतोच पण काही लोक असे जुगाड निर्माण करतात की इतरांना देखील त्यांचा हेवा वाटावा. देशात कुठल्याही गोष्टींची अडचण असेल त्यावर टॅलेंटेल्ड भारतीय उपाय शोधून काढतातच. या अडचणींवर १०० टक्के समाधान मिळतेच मिळते. असे जुगाड आपल्याला शहरांमध्ये किंवा गावांमध्ये बघायला मिळतात.आणि त्यांचे सोशल मीडियावर व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणवर व्हायरल होत असतात.
असेच एक जुगाड शिरपूर शहरातील गरीब घराण्यातून जन्माला आलेले भोई समाजातील व ढोले कुटुंबातील मेहनती, कष्टाळू, तसेच जिद्दीने काम करणारे व अनेर धरणातील स्वादिष्ट आणि जिवंत मच्छी विक्रीचा व्यवसाय असलेले रवी भोई मच्छी वाले म्हणून प्रसिद्ध आहेत. यांनी एक सेकंडहॅन्ड डिझेल बुलेट विकत घेतली व त्यावर प्रथम त्यांनी तिला सेल स्टार्ट करण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला त्यासाठी जळगाव, धुळे, सुरत, इंदोर अशा ठिकठिकानाहून डिझेल बुलेट गाडीचे वेगवेगळे पार्ट आणून काही पार्ट स्वतः डिझायनिंग करून, बनवून त्यांनी डिझेल बुलेट सेल स्टार्ट करण्याचा अशक्य असलेला प्रयत्न त्यांनी सक्सेस केला. त्यानंतर पुन्हा दुसरा एक अशक्य असा प्रयत्न जो होऊ शकत नाही तो सक्सेस करण्यासाठी पुन्हा वेगवेगळे पार्ट गोळा करून त्या गाडीस त्यांनी रिमोट कंट्रोल वर सुरू व बंद करण्याचे काम यशस्वीपणे बनवले.खरे पाहता डिझेल बुलेटला सेल्स स्टार्ट करणे आज एक अशक्यप्राय प्रयत्न होता आणि त्यातही तिला पुन्हा रिमोट कंट्रोल वर सुरू व बंद करणे हा दुसरा अशक्यप्राय प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला क कोणाची मार्गदर्शन अथवा गाईडलाईन्स न घेता एक सर्वसाधारण व्यक्तींने हे काम करणे खूप म्हणजे खूप मोठे आव्हान आहे.
वाहन क्षेत्रातील इंजिनिअरिंग झालेले व्यक्ती देखील असा जुगाड यशस्वीपणे एक वेळेला करू शकत नाही तो प्रयत्न रवि भोई यांनी स्वः मेहनतीने व स्वः कल्पनेने केलेला आहे. खास म्हणजे ही डिझेल बुलेट गाडी रिमोट कंट्रोल वर सुरू होते व बंद करता येते हा चमत्कार जवळपास महाराष्ट्रात प्रथमच कोणी केलेला असावा.त्यांच्या या जुगाडाचे सर्वत्र कौतुक होत असून,बरेच जण ही डिझेल बुलेट गाडी पाहण्यासाठी येतात त्यांना यात अजून जास्त मायलेज कशी देईल या दृष्टीने त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशा या जुगाड प्रेमीस कोणी वाहन उत्पादक कंपनीचा एखादा चांगला उद्योगपतीने साथ दिली, तर नक्कीच बुलेट क्रांती होण्यास वेळ लागणार नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा