Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

शिरपूर तालुका पोलिसांची धडक कारवाई 2 पिस्टल मॅगझीनसह 4 जिवंत काडतुस सह आरोपींना अटक



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना गोपनीय बातमीद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली असता दोन पिस्टल मॅक्झिनसह चार जिवंत काढतोस गुन्ह्यात वापरलेले वाहन व आरोपी असा एकूण 8.52,000/- रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून केलेल्या या धडक कारवाईचे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

दि.08/10/2022 रोजी दुपारी 03.00 वाजेच्या सुमारास सपोनि श्री सुरेश शिरसाठ सो.यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, रोहीणी भोईटी गावाकडून शिरपुर च्या दिशेने इरटिगा कार क्र. एम एच 13 बी.जे 9001 यात बसलेले चार इसम गावठी कट्टे (अग्नी शस्त्रे) घेवुन जात आहे.सपोनि / सुरेश शिरसाठ यांनी लागलीच एक पथक तयार करून यांना तात्काळ रवाना केले. रोहीणी भोईटी गावाकडे जात असतांना समोरुन सदरची वाहन इरटिगा कार येतांना त्यांना दिसली.सदर वाहनास पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने वाहन न थांबवता जोरात शिरपुर च्या दिशेने निघुन गेला सदर इरटिगा कारचा पाठलाग करून तिला चिलारे गावाजवळ वाहन अडवुन थांबविले असता,गाडीत बसलेल्या इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोसई/भिकाजी पाटील व पोसई/संदिप पाटील यांनी सदर इसमांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) राहुल विष्णु शिंदे वय 20 वर्षे, रा. मातंगनगर शुक्रवार पेठ, तुळजापुर जि.उस्मानाबाद, 2)अमोल रविंद्र कोरडे, वय 22 वर्षे,रा.आनंदनगर, हडको ता.तुळजापुर जि.उस्मानाबाद, 3) ओमकार गणेश रनदिवे, वय 21, रा. जिजामाता नगर हडको, तुळजापुर जि. उस्मानाबाद, 4) सुरज महताब शेख, वय 25 वर्षे, रा.आरळी (बु) ता. तुळजापुर जि.उस्मानाबाद हे मिळुन आले त्याचे कडे चौकशी करून गाडीची तपासणी केली असता गाडीच्या गिअर दांडीचे जवळ असलेल्या फायबर पार्टचे आडोश्यामध्ये लपवुन ठेवलेल्या 2 पिस्टल मॅगझीनसह 4 जिवंत काडतुस मिळून आल्याने सदर इसमांना ताब्यात घेतले त्यांचे जवळ मिळून आलेला मुद्देमाल 50,000/- रुपये किंमतीच्या दोन गावठी बनावटीच्या पिस्टल मॅगझीन सह 2) 2000/- रुपये किंमतीचे चार जिवंत काडतुस, 8,00,000/- रुपये किंमतीची एक मारुती कंपनीची इरटिगा कार क्र.एम.एच.बी.जे.9001असा एकूण 8.52,000 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून सदर आरोपींवर सदर गुन्ह्याबाबत पोना/ संदिप ठाकरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरुन गु.र.नं.238/2022 आर्म अॅक्ट कलम मुं.पो.का.कलम 3/25 चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोसई/भिकाजी पाटील करत आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव सो, प्रभारी मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश आहेर सो यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे सपोनि/सुरेश शिरसाठ, पोसई/संदिप पाटील, पोसई/भिकाजी पाटील, पोहेकॉ / संजय सुर्यवंशी,पोना संदिप पाटील, पोकों/ संजय भोई, पोकों/ कृष्णा पावरा, चालक पोकों / संतोष पाटील, पोकॉ/मुकेश पावरा यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध